Homeमाय व्हॉईसटीव्ही चॅनेल्सना केंद्राचा...

टीव्ही चॅनेल्सना केंद्राचा ‘सल्ला’! दहशतवादी आणि गुन्हेगारांना टाळा!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरचित्रवाणी वाहिन्यांनासाठी एक सूचनापपत्र जारी केले आहे. या सूचनापत्राद्वारे मंत्रालयाने, ज्या व्यक्तींवर दहशतवादासह इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत किंवा कायद्याने प्रतिबंधित असलेल्या संघटनांशी ज्यांचा संबंध आहेत, अशा व्यक्तींना कोणतेही व्यासपीठ देणे टाळावे,असे सांगण्यात आले आहे.

परदेशातील एका व्यक्तीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर नुकत्याच झालेल्या चर्चेतील सहभागाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला जारी करण्यात आला आहे. ही व्यक्ती भारतात कायद्याने प्रतिबंधित केलेल्या संघटनेशी संबंधित असून तिच्या विरोधात दहशतवादासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चर्चेदरम्यान त्या व्यक्तीने देशाचे सार्वभौमत्व/अखंडता, भारताची सुरक्षा, परदेशांबरोबर भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असलेल्या अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या.

सरकार प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करते आणि घटनेनुसार त्यांच्या अधिकारांचा आदरदेखील करते, परंतु त्याचवेळी दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे आशय प्रसारित करताना केबल दूरचित्रवाणी नेटवर्क्स (रेग्युलेशन) कायदा, 1995 मधील कलम 20 च्या उपकलम (2) या तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सूचनेचे तपशील खालील लिंकवर उपलब्ध आहेत.

https://new.broadcastseva.gov.in/digigov-portal-web-app/Upload?flag=iframeAttachView&attachId=140712323&whatsnew=true

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content