Homeहेल्थ इज वेल्थ१० मिनिटांत थायरॉईडची...

१० मिनिटांत थायरॉईडची शस्त्रक्रिया! रूग्ण २ तासातच घरी!!

थायरॉईडच्या ग्रंथीच्या आजाराने घशाला येणाऱ्या सुजेमुळे खाण्यापिण्यासाठी त्रास होणार्‍या एका ३२ वर्षीय महिलेवर ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ (एम. व्ही. ए.) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून के. बी. भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटांत झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर थायरॉईडविषयक उपचारासाठी करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेला अवघ्या २ तासानंतर खाण्यास, बोलण्यास व चालण्यास संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी अनुमती दिली आहे. या महिलेलादेखील संबंधित आजार व त्रासापासून दिलासा मिळाला आहे, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये नेहमीच नवनवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वैद्यकीय उपचार केले जातात. याच अंतर्गत आता थायरॉईडसंबंधित आजारांवर उपचारासाठी ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे. भाभा रुग्णालयातील ज्यांनी ही शस्त्रक्रिया केली त्या कान, नाक व घसा विभागातील डॉ. आम्रपाली पवार यांनी सांगितले की, वांद्रे परिसरात असणाऱ्या पालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागात (ENT Department) काही दिवसांपूर्वी घशाच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेली ३२ वर्षीय संगीता (नाव बदललेले) ही महिला उपचारासाठी आली होती. सदर महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांच्या घशातील थायरॉईड ग्रंथींना मोठ्या प्रमाणात सूज असल्याचे आढळून आले.

अशा प्रकारची सूज असल्यास सामान्यपणे गळ्यावर छेद देऊन शस्त्रक्रिया करण्यात येते. अशाप्रकारे करण्यात येणारी करण्यात येणारी शस्त्रक्रिया नाजूक व अवघड अशी शस्त्रक्रिया मानली जाते. या शस्त्रक्रियेला साधारणपणे २ तासांचा कालावधी लागतो. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवसांपर्यंत रुग्णालयात राहणे आवश्यक असते. त्याचसोबत चालणे – फिरणे – खाणे इत्यादीवर बंधने असतात. या शस्त्रक्रियेमुळे गळ्यावर तयार होणारे व्रण आयुष्यभर राहतात‌. या सर्व बाबी लक्षात घेऊन सदर महिलेवर अत्याधुनिक एम. व्ही. ए. पद्धतीची सूक्ष्म शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अत्याधुनिक एम. व्ही. ए. तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेत सोनोग्राफीच्या सहाय्याने व एक सूक्ष्म सुईद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात झालेल्या या शस्त्रक्रिये अंतर्गत सुईद्वारे थायरॉईडमधील बाधित पेशी नष्ट करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत गळ्यावर कोणताही छेद देण्याची गरज नसते. त्यामुळे सदर महिला रुग्णाला पूर्ण भूल देण्याऐवजी केवळ स्थानिक भूल (Local Anaesthesia) देण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांनी सदर महिला रुग्ण रुग्णास बोलण्याची अनुमती देण्यात आली. तसेच चालण्याची, फिरण्याची व खाद्यपदार्थ खाण्याचीदेखील परवानगी देण्यात आली. तर नंतर अवघ्या काही तासांनी सदर रुग्ण महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेचा कोणताही व्रण रुग्णाच्या शरीरावर नव्हता. एम. व्ही. ए. तंत्रज्ञान वापरून केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे सदर रुग्ण महिला शस्त्रक्रियेनंतर काही तासातच आपले दैनंदिन काम करण्यास सक्षम झाली आहे, अशीही माहिती डॉ. आम्रपाली पवार यांनी दिली आहे.

ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रेडिओलॉजी विभागाचे डॉ. रितेश खोडके, सिस्टर लीना नाईक आणि शस्त्रक्रिया गृहातील सहाय्यक किशोर कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले, असेही खुरशादजी बेहरामजी (के.बी.) भाभा महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content