Homeएनसर्कलपुण्यात 51 कोटींचे...

पुण्यात 51 कोटींचे मेथाक्वालोन ड्रग्ज जप्त!

गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय), पुणे प्रादेशिक युनिट, पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथे तेलंगणा इथे नोंदणी असलेली एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मोटार अडवली. वाहनाची सविस्तर तपासणी केली असता त्यात पांढरे स्फटिक असलेले चार निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कंटेनर असल्याचे आढळून आले. प्राथमिक क्षेत्रीय  चाचण्यांनी यातील पदार्थ मेथाक्वालोन असल्याचे सूचित झाले,एनडीपीएस  कायदा, 1985च्या तरतुदी अंतर्गत हा एक सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर विपरीत परिणाम करणारा पदार्थ आहे. या वाहनासह नमूद केलेला 101.31 किलोग्रॅम ज्याची किंमत 50.65 कोटी रुपये (अंदाजे) असलेला कथित बेकायदेशीर पदार्थ मेथाक्वॉलोन, एनडीपीएस कायदा, 1985च्या तरतुदीनुसार डीआरआयने जप्त केले आहे.

या प्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या पाच जणांना एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, अटक करण्यात आलेले लोक बेकायदेशीर विक्री आणि/किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांची खरेदी, वाहतूक आणि निर्यात करण्यात गुंतलेले होते आणि या टोळ्या भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या असू शकतात आणि त्यांचे परदेशातही संबंध असू शकतात. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालय ही एक प्रमुख संस्था आहे जी आयात निर्यातीमधील  फसवणुकीविरोधात   तसेच तस्करी आणि अंमली पदार्थाना चाप लावण्यासाठी कार्य करते.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content