Homeहेल्थ इज वेल्थमिझोरममध्ये आयुष्मान भारत...

मिझोरममध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशनची पहिली मायक्रोसाइट कार्यान्वित

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) देशभरात आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) या मोहिमेचा त्वरित अवलंब करण्यासाठी 100 मायक्रोसाइट्स तयार करण्याचा प्रकल्प जाहीर केला होता. ही मायक्रोसाइट्स कार्यरत करणारे मिझोराम हे भारतातील पहिले राज्य असून या राज्याची राजधानी असलेल्या आयझॉल येथे आयुष्मान भारत डिजिटल मिशनची (ABDM) पहिली मायक्रोसाइट कार्यान्वित झाली आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत 100 मायक्रोसाइट्सचा प्रकल्प खाजगी क्षेत्रातील लहान आणि मध्यम स्तरावरील आरोग्य सेवा प्रदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे, असे या प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणाले. देशभरातील आरोग्यसेवांचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी मायक्रो साइट्सची संकल्पना मांडण्यात आली होती.

आयझॉलमध्ये, 23 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या मायक्रोसाइट प्रकल्पाच्या उदघाटन समारंभात, मिझोरामच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव, कुबेट्सी झोथनपरी सायलो, म्हणाले, आरोग्यसेवांचे डिजिटायझेशन केल्यानेच, सार्वजनिक आरोग्यसेवा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे ध्येय साध्य करण्यात मदत होऊ शकते, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. एमबीडीएम (ABDM) मायक्रोसाइट्स विविध भौगोलिक प्रदेश परिभाषित करून तेथील लहान आणि मध्यम स्तरावरील खाजगी आरोग्य सेवा प्रदात्यांची नोंद ऑनबोर्ड करुन या सेवा पोहोचण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या मायक्रोसाइट्सवरून, मुख्यत्वे करून एमबीडीएमच्या राज्यातील अधिकाऱ्यांद्वारे सेवांची अंमलबजावणी केली जाईल तर आर्थिक संसाधने आणि एकूण मार्गदर्शन एनएचए(NHA) द्वारे प्रदान केले जाईल. या कार्यक्रमांतर्गत इंटरफेसिंग एजन्सीकडे परिसरातील आरोग्य सेवा प्रदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत समूह असेल. हे समूह एमबीडीएममुळे होणाऱ्या लाभांसंबंधी जागरूकता निर्माण करेल आणि सेवा प्रदात्यांना एमबीडीएमच्या प्रमुख नोंदणी पुस्तकात सामील होण्यास मदत करेल तसेच एमबीडीएमच्या वापरास प्रोत्साहन देईल आणि नियमित आरोग्यसेवांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी डिजिटल पध्दतींचा वापर सक्षम करेल.

रूग्ण या सुविधेवरून तयार केलेल्या आरोग्य नोंदी त्यांच्या आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी त्यांच्या फोनवरून (ABHAs) लिंक करू शकतील तसेच त्या पाहू शकतील, त्याचप्रमाणे एबीडीएम सक्षम वैयक्तिक आरोग्य नोंदी (PHR,पर्सनल हेल्थ रेकॉर्ड) कुणाशीही सामायिक करू शकतील. (https://phr.abdm.gov.in/uhi/1231). एनएचएने यापूर्वी मुंबई, अहमदाबाद आणि सुरत येथे मायक्रोसाइट्सच्या नमुना प्रात्यक्षिकांचे निरीक्षण केले होते. या प्रात्यक्षिकांतून मिळालेले ज्ञान आणि अनुभव एबीडीएमअंतर्गत 100 मायक्रोसाइट्स या प्रकल्पाच्या एकूण संरचनेत समाविष्ट केले गेले आहेत.


मिझोराम व्यतिरिक्त, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड सह इतर राज्यांनी देखील एबीडीएम मायक्रोसाइट्सच्या अंमलबजावणीत लक्षणीय प्रगती केली आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content