Homeडेली पल्स'मॉनिटरींग कक्ष' मुख्यमंत्र्यांच्या...

‘मॉनिटरींग कक्ष’ मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रुम’ला पूरकच!

कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तत्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मंत्रालयातील ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून कार्यरत असून हा कक्ष मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रुम’ला सहाय्यक, पूरक भूमिका बजावत आहे, असे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ राज्याची विकासप्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखिल ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चा माध्यमातून आपले योगदान देत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात घेतलेली ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’ची बैठक 24वी बैठक होती. या बैठकीत कोकणातील पर्यटन केंद्रांना जोडणारा कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, सातारा-अलिबागची वैद्यकीय महाविद्यालये, पुणे मेट्रो, पुणे रिंग रोड, मुंबईतील जीएसटी भवन, पुणे येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूरचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, पंढरपूर शहर, विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदीं विकासकामांच्या प्रगतीचा तसेच निधी उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला.

पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोनं प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला…

विकासकामतील अडथळे दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. दर पंधरवड्याला नियमितपणे कक्षाची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. प्रक्रियेतील अडथळे दूर केले जातील. विकासप्रक्रिया गतिमान केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘वॉर रुम’च्या माध्यमातून निश्चित केलेल्या ध्येयपूर्तीसाठी, ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष’ सहायकाची भूमिका यापुढेही पार पाडत राहील. राज्यातील विकासप्रकल्पांना केंद्राची मंजुरी, मदत, सहकार्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली प्रयत्न केला जाईल. मुख्य सचिवांसह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, ‘वॉर रुम’चे प्रमुख राधेशाम मोपलवार हे सर्वच जण कक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून ‘वॉर रुम’ तसेच ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून योगदान देत आहेत. या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे व्यक्त करण्यात आला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content