Homeहेल्थ इज वेल्थआयुष्मान भारतमधील घोटाळ्यांविरुद्ध...

आयुष्मान भारतमधील घोटाळ्यांविरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर!

आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (एबी-पीएमजेएवाय) होऊ शकणारे संशयास्पद व्यवहार/ घोटाळ्यांच्या शक्यता तपासण्यासाठी केंद्र सरकार कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तसेच मशीन लर्निंग या तंत्रज्ञानांचा वापर करत आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान आरोग्यसुविधांच्या बाबतीत होणाऱ्या फसवणुकीला आळा घालणे, त्यांचा शोध तसेच प्रतिबंध यासाठी या तंत्रज्ञानांचा वापर केला जात असून पात्र लाभार्थ्यांना योग्य उपचार मिळण्याची खात्री बाळगण्यासाठी त्यांची मोठी मदत होत आहे. एआय/एमएल चा वापर करून फसवणूकविरोधी उपाययोजनांची आखणी  तसेच त्यांचा वापर यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारांना नियुक्त करण्यात आले आहे.

दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी प्राप्त माहितीनुसार, या योजनेअंतर्गत एकूण 24.33 कोटी आयुष्मान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 97,76,594 आयुष्मान भारत कार्डे जारी करण्यात आली आहेत. या योजनेतून जारी करण्यात आलेल्या एकूण आयुष्मान भारत कार्डांचा राज्य/ केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

एबी-पीएमजेएवाय योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेल्या आयुष्मान भारत कार्डांचा राज्य / केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील

State/UTNumber of Ayushman cards created
Andaman and Nicobar Islands40,874
Andhra Pradesh1,31,06,252
Arunachal Pradesh93,301
Assam1,60,63,937
Bihar80,09,790
Chandigarh1,57,731
Chhattisgarh2,00,41,832
Dadra and Nagar Haveli & Daman and Diu4,31,331
Goa28,431
Gujarat1,76,63,786
Haryana85,23,559
Himachal Pradesh11,35,675
Jammu And Kashmir82,64,239
Jharkhand1,12,41,377
Karnataka1,41,95,295
Kerala72,48,633
Ladakh1,34,515
Lakshadweep26,190
Madhya Pradesh3,62,18,679
Maharashtra97,76,594
Manipur4,89,373
Meghalaya18,19,920
Mizoram4,38,471
Nagaland6,00,519
Puducherry4,21,796
Punjab78,60,437
Rajasthan1,09,49,199
Sikkim54,875
Tamil Nadu45,40,231
Telangana72,36,809
Tripura13,34,680
Uttar Pradesh3,00,14,691
Uttarakhand51,51,774
Total24,33,14,796

टीप: दिल्ली, ओदिशा आणि पश्चिम बंगाल ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश एबी-पीएमजेएवाय योजनेची अंमलबजावणी करत नाहीत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल यांनी राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content