प्रभावी कामगिरी दर्शवणाऱ्या हॉट सीरीजला आणखी बळकटी देत इन्फिनिक्स, हा ट्रान्सशन ग्रुपचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड ‘हॉट १० प्ले’ भारतीय बाजारपेठेत येत असून येत्या २६ एप्रिलपासून तो फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.
नव्या उत्पादनात अतिरिक्त जिओ ऑफर अंतर्गत प्रत्येक डिव्हाइसवर ३४९ रुपयांचे प्रीपेड रिचार्ज, ४००० रुपये मूल्याचे लाभ (यात ४० रुपयांचे ४० कॅशबॅक वाऊचर आणि २००० रुपये मूल्याचे पार्टनर ब्रँड कूपन्स) असतील.
संपूर्ण मनोरंजन करणाऱ्या हॉट १० प्लेमध्ये नव्या काळातील आर्किटेक्चर, जबरदस्त बॅटरी, उत्कृष्ट कॅमेरा, सामर्थ्यवान आवाज, रिडिफाइन्ड चिपसेट आणि ग्राहकांना आकर्षक, नेक्स्ट लेवल स्मार्टफोनचा अनुभव देणाऱ्या अत्याधुनिक सुविधा असतील. हा फोन मोरांडी ग्रीन, 7° पर्पल, एजीन ब्लू आणि ऑबसिडियन ब्लॅक या चार रंगात उपलब्ध आहे.
स्क्रीनवर आकर्षक कंटेंट पाहण्याची खात्री देणारा हॉट १० प्ले ६.८२” एचडी+सिनेमॅटिक ड्रॉप नॉच डिस्प्लेसह येतो. तसेच ९०.६६% स्क्रीन-टू-बॉडी रेशो लाँगची सुविधा यात आहे. यात हेलिओ जी ३५ ऑक्टा कोअर प्रोसेसर असून याद्वारे २.३ गिगाहर्टजपर्यंत सीपीयू क्लॉक स्पीड मिळते. ४ जीबी रॅम / ६४ जीबी स्टोरेज असलेल्या हॉट १० प्लेमध्ये ३ कार्ड स्लॉट (ड्युएल नॅनो सिम + मायक्रो एसडी)सह २५६ जीबीपर्यंत विस्तारणारी मेमरी आहे.
हे डिव्हाइस अँड्रॉइड १०वर ऑपरेट होते. यात एक्सओएस ७ स्क्रिन येते. याद्वारे यूझरला स्मूथ आणि अधिक वेगवान सॉफ्टवेअर यूएक्स मिळते. अधिकच्या सुरक्षिततेसाठी, डिव्हाइसमध्ये फेस अनलॉक फीचर आणि मल्टीफंक्शनल फिंगरप्रिंट सेंसर आहे. ते केवळ स्मार्टफोन अनलॉकसाठी नाही तर कॉल्स घेणे, अलार्म डिसमिस करणे किंवा क्विक स्टार्ट अॅपसाठी उपयुक्त ठरते.
हॉट १० प्लेमध्ये ६००० एमएएचची हेवी ड्युटी बॅटरी असून तिला पॉवर मॅरेथॉन टेक्नोलॉजीचे बळ मिळाले आहे. याद्वारे पॉवर वाढते आणि बॅटरी बॅकअप २५%नी वाढते. बॅटरी ५५ दिवसांपेक्षा जास्त स्टँडबाय टाइम देते. यात २३ तासांपर्यंत नॉनस्टॉप व्हिडिओ प्लेबॅक, ५३ तासांचा ४ जी टॉक-टाइम, ४४ तासांचा म्युझिक प्लेबॅक, २३ तासांचे वेब सर्फिंग मिळते. यात १३ एमपी एआय ड्युएल रिअर कॅमेरा असून त्यात एफ / १.८ लार्ज अपार्चरसह क्वाड एलईडी फ्लॅश आहे. तसेच एलईडी फ्लॅश, स्लो-मो व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि डोक्युमेंट मोडदेखील आहे.