Homeचिट चॅटअजय थिओफिलस गोव्याचे...

अजय थिओफिलस गोव्याचे नवे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग!

रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांनी आयएनएस हंसा, गोवा येथे आयोजित सेरेमोनियल परेडमध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया (FOGA) म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी भारतीय नौदल अकादमीचे उप कमांडंट म्हणून काम पाहिले आहे.

01 जुलै 1991 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त झालेले, रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांची जून 1992 मध्ये पायलट अभ्यासक्रमासाठी निवड झाली आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते नौदल विमानवाहूच्या लढाऊ प्रवाहात सामील झाले.

त्यांनी किरण, HPT-32, मिग-21, सी हॅरियर आणि मिग-29K विमानांचे सारथ्य केले आहे आणि त्यांना 3,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. आयएनएस विक्रमादित्यवर MiG-29K उतरवणारे ते पहिले भारतीय पायलट होते. त्यांनी 2001 मध्ये फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केला असून ते सी हॅरियर आणि मिग-29K विमानांचे प्रशिक्षक आहेत.

MiG-29K प्रकल्पाचे प्रमुख म्हणून रिअर अ‍ॅडमिरल थिओफिलस यांची निवड करण्यात आली आणि रशियामध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्क्वाड्रनचे नेतृत्व केले आणि नंतर आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकासोबत संयुक्तरित्या स्क्वाड्रनचे नेतृत्व केले. त्यांनी आयएनएस विक्रमादित्यचे कॅप्टन (एअर) म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या कमांडच्या कार्यकाळात आयएनएस त्रिंकट, तलवार आणि तर्कश यांचा समावेश आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content