Homeकल्चर +2,000 वर्षे जुन्या...

2,000 वर्षे जुन्या जहाजबांधणी तंत्राचे होणार पुनरुज्जीवन!

‘स्टिच्ड शिपबिल्डिंग मेथड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या जहाजबांधणीच्या 2000 वर्ष जुन्या तंत्राचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्याच्या उल्लेखनीय उपक्रमाअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि कार्यान्वयनावर भारतीय नौदल देखरेख ठेवेल. त्यांचा बहुमूल्य अनुभव आणि तांत्रिक ज्ञान प्राचीन जहाज बांधणी पद्धतीचे यशस्वी पुनरुज्जीवन तसेच जहाजाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. 

ऐतिहासिक महत्त्व आणि पारंपारिक कारागिरीचे जतन लक्षात घेता, भारतामध्ये या प्राचीन जहाज बांधणी पद्धतीला मोठे सांस्कृतिक महत्व आहे. संपूर्ण इतिहासात, भारताला एक भक्कम सागरी परंपरा लाभली आहे आणि अशा पद्धतीने निर्मित जहाजांनी व्यापार, सांस्कृतिक देवघेव आणि शोध कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

खिळे वापरण्याऐवजी लाकडी फळ्या एकत्र जोडून बांधण्यात आलेली ही जहाजे लवचिकता आणि टिकाऊपणा देतात, ज्यामुळे माशांचा मोठा थवा (शोल्स) आणि वाळूच्या बंधाऱ्यापासून होणारे नुकसान कमी होते. युरोपियन जहाजांच्या आगमनामुळे जहाजबांधणीच्या तंत्रात बदल झाला असला तरी, जहाज बांधणीची कला भारतातील काही किनारी प्रदेशांमध्ये, प्रामुख्याने लहान स्थानिक मासेमारी नौकांसाठी अजूनही टिकून आहे.

भावी पिढ्यांसाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी लुप्त होत चाललेल्या या कलेचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. जहाज बांधणीच्या प्राचीन भारतीय कलेचा वापर करून महासागरात जाणारे लाकडी बांधणीचे जहाज तयार करण्याचा प्रस्ताव हा एक स्तुत्य उपक्रम आहे.

भारतातील उर्वरित पारंपरिक जहाज निर्मात्यांच्या कौशल्याचा लाभ घेणे आणि त्यांची असाधारण कारागिरी सर्वांसमोर आणणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. पारंपरिक नौवहन तंत्रांचा वापर करून प्राचीन सागरी मार्गांवर प्रवास करून, हा प्रकल्प हिंद महासागरातील ऐतिहासिक परस्परसंवादाची सूक्ष्म दृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करत आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती, ज्ञान प्रणाली, परंपरा, तंत्रज्ञान आणि कल्पनांचा प्रवाह सुलभ झाला.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content