Homeडेली पल्ससहाराच्या ग्रामीण दावेदारांनी...

सहाराच्या ग्रामीण दावेदारांनी वापर करावा सामान्य सेवा केंद्रांचा!

खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी सहारा रिफंड पोर्टल, म्हणजेच सहकारी संस्था केंद्रीय निबंधक सहारा परतावा पोर्टलवर दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या वैध ठेवीदारांना परतावा मिळवण्याच्या प्रक्रियेत, CRCS- सहारा रिफंड पोर्टलवर त्यांचे दावे दाखल करण्यामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs), अर्थात सामान्य सेवा केंद्र सहाय्य करतील. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी 18 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे  https://mocrefund.crcs.gov.in  या सहकारी संस्था केंद्रीय निबंधक (CRCS)-सहारा रिफंड पोर्टलचा शुभारंभ केला.

देशभरातील 5.5 लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे इंटरनेट जोडणी, संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर इत्यादी आवश्यक सुविधांनी सुसज्ज असलेल्या 300 पेक्षा जास्त ई-सेवा पुरवत आहेत. वैध ठेवीदार CRCS- सहारा रिफंड पोर्टलवर दावे दाखल करण्यासाठी आपल्या जवळच्या सामान्य सेवा केंद्राची मदत देखील घेऊ शकतील.

सहाराच्या वैध ठेवीदारांना गाव पातळीवरील उद्योजकांनी (VLEs) सहाय्य करावे अशी विनंती सामान्य सेवा केंद्रांनी (CSC-SPV) केली आहे, आणि लोकांना सामान्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून आपले दावे दाखल करता यावेत, या दृष्टीने आपली प्रणाली सक्षम केली आहे. सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या वैध ठेवीदारांना दावे दाखल करता यावेत, यासाठी CRCS- सहारा रिफंड पोर्टल, विकसित करण्यात आले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content