Homeडेली पल्सपंतप्रधानांकडून आणखी दोन...

पंतप्रधानांकडून आणखी दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वेस्थानकावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना काल हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला. गोरखपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. 498 कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावित स्थानकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोरखपूरचे खासदार रवि किशन शुक्ला, लोकप्रतिनिधी आणि विशेष अतिथी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

गोरखपूर – लखनौ वंदे भारत एक्स्प्रेस अयोध्या मार्गे जाईल आणि ही गाडी सुरू केल्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे आणि उत्तर प्रदेशातील  महत्त्वाच्या शहरांशी अधिक चांगला संपर्क प्रस्थापित  केला जाणार आहे.

जोधपूर – साबरमती वंदे भारत एक्सप्रेस, या क्षेत्रातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देत जोधपूर, अबू रोड आणि अहमदाबाद सारख्या प्रसिद्ध ठिकाणांशी दळणवळण सुधारणार आहे.

498 कोटी रुपये खर्चून गोरखपूर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास केला जाणार असून तिथे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content