Homeकल्चर +शोभा नाखरे यांची...

शोभा नाखरे यांची संजीवनी मराठे यांच्या साहित्यिक विश्वाला आदरांजली!

संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी साहित्यक्षेत्रावर अधिराज्य केले. कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या संजीवनी मराठे या गीतरचना आणि काव्यगायन यासाठी मराठी साहित्य विश्वात ओळखल्या जातात. त्यांच्या साहित्यिक विश्वाचा आढावा घेणारे पुस्तक संजीवनी मराठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व या शीर्षकात प्रसिद्ध निवेदिका आणि साहित्यिक शोभा नाखरे यांनी लिहिले असून नवचैतन्य प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.

काळाच्या पुढील विचार मनीमानसी रुजवत, काहीशा बंडखोर भूमिका घेत, आपल्या प्रेमाची रुजवात करून सूरशब्द पेरत, मनाच्या कलासक्त गाभाऱ्यात चिरंतन जपून अनेकांना संस्कारक्षम विचारांना मार्ग दाखविणाऱ्या संजीवनी मराठे यांना वाहिलेली ही आदरांजली असल्याचे लेखिकेने म्हटले आहे.

१९३२ साली कोल्हापूर येथील साहित्यसंमेलनातून त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांच्यावर भा. रा. तांबे तसेच रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याची मोहिनीही त्यांत्यावर होती. तांबे यांची जीवनसृष्टी, सौंदर्यशक्ती, तसेच शब्दकळा, आविष्कराचे वळण यांचा संजीवनींच्या कवितेवरील संस्कार स्पष्ट आहे. मनोरमा रानडे यांच्या काव्यातून आधुनिक सुशिक्षित, सुसंस्कृत स्त्रीमनाचा विशेषत: तिच्या प्रणयभावनेचा, जो एक सहजमोकळा आविष्कार घडण्यास प्रारंभ झाला होता, त्याची परंपराही संजीवनींच्या कवितेत पृथगात्य स्वरूपात प्रवाहित झालेली दिसते. प्रणयानुभवातील तरल स्पंदने, त्याची स्वप्‍निलता, अलौकिकता व्यक्त करणारी त्यांची कविता तिच्या अस्सलपणामुळे व वेगळेपणामुळे विशेष मनोवेधक ठरली. ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे गीत याचे उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण होय.

त्यांचा पहिला कवितासंग्रह काव्यसंजीवनी. त्यानंतर राका, संसार, छाया, चित्रा, चंद्रफूल, मी दिवाणी, आत्मीय, भावपुष्प, परिमला असे कविता आणि गीतसंग्रह प्रकाशित झाले. बालमनाची संवेदनशीलता त्यांच्या कवितेतून दिसत असे. त्यांचे खेळकर, निरागस भावविश्व त्यातून साकारले गेले होते. त्यातील अनेक गीते आजही आठवणीत आहेत.

संजीवनी मराठे यांचे बालपण, जीवनचरित्र, साहित्यिक व्यक्तिमत्व, कौटुंबिक आयुष्य, गद्य, अनुवादित साहित्य व संपादन, गीतरचना, बालकविता, काव्यलेखन, साहित्य यांची माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न शोभा नाखरे यांनी केला आहे. नव्या पिढीला तसेच साहित्यिक क्षेत्रासाठी ही एक पर्वणी आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content