Homeएनसर्कलपद्म पुरस्कार-2024साठी 15...

पद्म पुरस्कार-2024साठी 15 सप्टेंबरपर्यंत द्या नामांकने!

प्रजासत्ताक दिन, 2024 च्या निमित्ताने  घोषित करण्यात येणार्‍या पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकने/शिफारशी स्वीकारायला 1 मे 2023 रोजी प्रारंभ झाला. या पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याची शेवटची तारीख  15 सप्टेंबर 2023 ही आहे. यासाठीची नामांकने/शिफारसी केवळ ऑनलाईन स्वरूपातच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर पाठवता येतील.

या नामांकने/शिफारसीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध विहित नमुन्यात संपूर्ण  माहिती भरुन पाठवायची आहे. त्यामध्ये शिफारस केलेल्या संबंधित व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती (जास्तीत जास्त 800 शब्दांत) भरुन पाठवायची आहे, ज्यात त्या व्यक्तीची, संबंधित क्षेत्र/शाखेतील  उल्लेखनीय कार्य, सेवा  यांचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख असावा.

पद्म

या संदर्भातील सविस्तर माहिती, ‘पुरस्कार आणि पदके (‘Awards and Medals’) शीर्षकाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  (https://mha.gov.in)  आणि  पद्म पुरस्कार पोर्टल  (https://padmaawards.gov.in)  वर  उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम देखील  https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx  या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content