Homeडेली पल्सबरौनीचे राष्ट्रीय औष्णिक...

बरौनीचे राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ देशात अव्वल!

चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट उद्योग विभागात बरौनीच्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने अव्वल स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाला हा पुरस्कार देत भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने, त्यांनी जल स्रोतांचे संवर्धन आणि व्यवस्थापनासंदर्भात केलेल्या विशेष प्रयत्नांचे महत्व अधोरेखित केले. 

राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने पर्यावरण जतनासाठी सातत्याने शाश्वत आणि समर्पित प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या य़शात या प्रयत्नांचा फार मोठा वाटा आहे. जल स्रोतांचे  संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या महामंडळाने राबवले आहेत.

आज, 17 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीत, राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग आणि बरौनीच्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचे प्रकल्प प्रमुख राजीव खन्ना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content