Homeडेली पल्सवस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी...

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी करा २० जूनपर्यंत अर्ज

केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा)करीता १३ जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरीकरीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

यासाठी प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांच्यामार्फत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी २० जून २०२३पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त एम. जे. प्रदीप चंदन यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज २० जून २०२३ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत. प्रवेशअर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in येथे उपलब्ध आहे. शिवाय अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातदेखील उपलब्ध आहे, असेही चंदन यांनी कळविले आहे.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content