Homeहेल्थ इज वेल्थब्लड कॅन्सरशी लढत...

ब्लड कॅन्सरशी लढत आर्यनने दहावीत मिळवले तब्बल ९६ टक्के!

मागच्या ऑक्टोबरमध्ये ऐन दिवाळीपासून रक्ताच्या कर्करोगाशी (ब्लड कॅन्सर) खंबीरपणे लढा देत मुंबईतल्या विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेचा विद्यार्थी आर्यन रहाटे याने नकत्याच झालेल्या आयसीएसई बोर्डाच्या परिक्षेत तब्बल ९६.४ टक्के मिळवत आपले शैक्षणिक प्राविण्य सिद्ध केले आहे.

पार्ले टिळक विद्यालयात शिकणारा १६ वर्षांचा आर्यन शाळेच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन होता. गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या सुमाराला ऑक्टोबरमध्ये, आर्यनला सतत ताप येऊ लागला. विविध स्तरावरच्या उपचारानंतरही हा ताप काही हलेना. तो येत-जातच होता. त्यामुळे अशक्तपणाही प्रचंड वाढला होता. नोव्हेंबर उजाडताच १ तारखेला आर्यनला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. वैद्यकीय भाषेत त्याला एक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणतात. यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता टिकवणाऱ्या रक्तातल्या पांढऱ्या पेशींवर वाईट परिणाम होतो.

आर्यनला हा आजार कळला. पण तो डगमगला नाही. शाळेत जाणे शक्य नव्हते, कोचिंग क्लासला जाता येत नव्हते. पण तरीही त्याने आपला अभ्यास चालूच ठेवला. शाळेनेही त्याला मदतीचा हात दिला. प्रोजेक्ट्स तसेच असाईंन्मेंट्स सादर करण्यास आर्यनला मुदतवाढ दिली. आर्यनला इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला एका स्वतंत्र खोलीत विलगीकरणात राहून परीक्षा द्यावी लागली. तीन पेपर तर त्याने सांताक्रूझच्या सूर्या हॉक्पिटलच्या बेडवर बसून लिहिले. याचा एकत्रित परिणाम परीक्षेच्या निकालात दिसून आला. आर्यनच्या गुणपत्रिकेवर तब्बल ९६.४ टक्के गुण नोंदविले गेले.

आर्यनचा पहिला एमआरडी रिपोर्ट डिसेंबर २०२२मध्ये आला. तो फारसा उत्साहवर्धक नव्हता. मात्र आता फेब्रुवारी २३मध्ये काढलेल्या एमआरडीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन महिने त्याला मोठ्या प्रमाणात केमोथेरपी घ्येवी लागली. यात त्याच्या डोक्यावरचे केस गळून पडले. परंतु तो खचला नाही आणि अभ्यासाची जिद्दही सोडली नाही. डॉ. निशा अय्यर आर्यनवर उपाचार करत आहेत. बालपणात झालेला रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा होतो, असे या क्षेत्रातले अनेक निष्णात डॉक्टर सांगतात. याच उमेदीवर आर्यन आणि त्याचे कुटुंबीय प्रत्येक दिवसाला धैर्याने सामोरे जात आहेत.

ब्लड कॅन्सरशी झुंज देत दहावीच्या परीक्षेत ९६.४ टक्के गुण मिळवल्याबद्दल उद्धव ठाकरे गटाचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर व महिला शाखासंघटक अपर्णा उतेकर यांनी त्याच्या घरी जाऊन आर्यनचा सत्कारही केला.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content