Homeचिट चॅटआयसीएसई (१०वी) व...

आयसीएसई (१०वी) व आयएससी (१२वी) परीक्षांमध्ये मुलींची बाजी!

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई), या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल ९८.९४ टक्के लागला आहे तर आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. आयसीएसई (दहावी)च्या निकालामध्ये मुलींनी चांगली कामगिरी बजावली असून यात मुलींचे पास होण्याचे प्रमाण ९९.२१ टक्के आहे तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९८.७१ टक्के आहे. तसेच आयएससी (बारावी)च्या निकालांमध्येही मुलींनी बाजी मारली असून ९८.०१ टक्के मुली पास झाल्या आहेत तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे.     

आयसीएसई (दहावी)च्या निकालांमध्ये भारतात पश्चिम भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.८१ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यापाठोपाठ दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.६९ टक्के आहे. आयएससी (बारावी)च्या निकालांमध्ये दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.२० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यापाठोपाठ पश्चिम विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९८.३४ टक्के आहे.

मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, जे निकालाची वाट पाहत होते. अखेर काल दुपारी तीन वाजता निकाल जाहीर झाले. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकतात. ही सुविधा २१ मेपर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content