Homeएनसर्कलआता अल्पसंख्याकांच्या कर्जाची...

आता अल्पसंख्याकांच्या कर्जाची परतफेड होणार ऑनलाईन!

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात व राज्य शासनामार्फत भागभांडवल स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाच्या या योजनांमधील कर्ज परतफेडीसाठी आता ऑनलाईन सेवा विकसित करण्यात आली असून त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

महामंडळाच्या कर्ज वसुलीसाठी आतापर्यंत लाभार्थ्याकडून आगाऊ दिनांकित धनादेश घेण्यात येत होते. महामंडळामार्फत आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्टेट बँक कलेक्ट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सहजरित्या व सुलभपणे करणे लाभार्थ्यांना शक्य झाले आहे. कुठुनही ऑनलाईन पद्धतीने कर्जाच्या हप्त्याची परतफेड करणे शक्य झाले आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याची पावतीदेखील ऑनलाईन पद्धतीनेच त्वरित लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी State Bank Collect प्रणालीला प्राधान्य देऊन त्याद्वारेच कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्याना केले आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content