Homeएनसर्कलनवी मुंबईत आज दुपारपासून...

नवी मुंबईत आज दुपारपासून उद्यापर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहवी याकरीता दि. 15 एप्रिल 2023 रोजी दु. 14.00 वा. ते दि. 16 एप्रिल 2023 रोजी रात्रौ 23.00 वा.पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड-अवजड वाहनांच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

दि. १५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते दिनांक १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमूद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडून ठाणे बेलापूर रोडने तसेच शिळफाटयाकडून महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनाना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.

२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रूतगती मार्गाने ऐरोली टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनाना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रूतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडून गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या व जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड-अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील जड-अवजड वाहनांना लागू असणार नाही.

नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडरपासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील, असेही त्यांनी कळविले आहे.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

अ) प्रवेश बंद:-

दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दिनांक 17 एप्रिल 2023च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमूद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेशबंदी असणार आहे.

ब) पर्यायी मार्ग:-

1) पुणे-मुंबईकडून स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जाऊन कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जाऊन पुढे इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असेही काकडे यांनी कळविले आहे.

आज व उद्या खारघरमधील वाहतुकीत बदल

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ वाजल्यापासून १६ एप्रिलच्या रात्री ११ वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिजखालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौकपर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायांना घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता खुला राहणार आहे, असे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

अ) प्रवेश बंद:-

दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजल्यापासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौकपर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

ब) पर्यायी मार्ग:-

१) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजाकडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.

(३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे काकडे यांनी कळविले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content