Homeडेली पल्सडॉ. नीलम गोऱ्हेंनी...

डॉ. नीलम गोऱ्हेंनी केले म्हसोबा मंदिरातल्या उपक्रमांचे अनावरण

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील खारवडे येथील म्हसोबा मंदिराचे नव्याने केलेल्या कामाचे, मंदिर वेबसाईट आणि मंदिराच्या वर्णनपर गीताचे अनावरण आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.

म्हसोबा यात्रेच्या निमित्ताने आज डॉ. गोऱ्हे या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. हनुमान जयंती उत्सवाच्या आज त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी म्हसोबा देवस्थानचे प्रलंबित प्रश्न सोडविताना आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले.  यावेळी केलेल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत मधुरा भेलके यांनी केले. मानव्य संस्थेच्या एचआयव्हीबाधित मुलांसाठीच्या कार्याबद्दल देवस्थानच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिरीष लवाटे यांना सपत्नीक “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, पदाधिकारी विलास सोनवणे, मंदिर देवस्थानाच्या विश्वस्त मधुरा भेलके, शंकर मांडेकर, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंहभारती, गुरुवर्य भाऊ महाराज परांडे, मानव्य संस्थेचे शिरीष लवाटे आदी उपस्थित होते. हनुमान जयंती उत्सवानिमित्त म्हसोबा देवस्थानची आरती आज डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content