Homeएनसर्कल'टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियातज्ज्ञ...

‘टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. अनमोल सोनवणे सन्मानित!

मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनवणे यांना नुकतेच “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात केसीसीआय या देशातील नामांकित संस्थेतर्फे नवी दिल्लीत डॉ. सोनवणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजवर टॅव्‍ही हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान दिले आहे. आजच्या घडीला टॅव्‍ही (TAVI) व टॅव्‍हर (TAVR) हृदय शस्त्रक्रियेतील देशातील आघाडीचे तज्ञ म्हणून डॉ. अनमोल सोनवणे यांचे नाव घेतले जाते. 

अनेक हृदयरोग रुग्णांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या हळूहळू अरूंद होऊ लागल्याने हृदय कमकुवत होऊ लागते. हृदय निम्म्या क्षमतेने रक्त पुरवण्याचे काम करू लागते. अशा रुग्णांवर ओपन हार्ट सर्जरी करणे धोकादायक ठरू शकते. अशात सध्या TAVI आणि TAVR शस्त्रक्रिया वरदान ठरत आहेत. अशा आजारात ओपन हार्ट सर्जरी न करता टॅव्‍ही व टॅव्‍हर तंत्रज्ञानातून हृदयाच्या झडपांचे (व्हॉल्व्ह बदलाचे) उपचार करता येतात.

त्या तंत्रज्ञानात डॉ. अनमोल सोनवणे निष्णात मानले जातात. त्यांनी देशातील 14 राज्यांतील 32 शहरांमधील 105 सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तसेच जगभरातील 22 देशांत शेकडो टॅव्‍ही व टॅव्‍हर शस्त्रक्रिया करून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्याच कार्यासाठी त्यांना नवी दिल्लीतील “दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज”तर्फे (केसीसीआय) TAVI / TAVR कार्यासाठी” यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हृदयाच्‍या झडपेविषयक कॅलिसिफिक एओर्टिक स्टेनोसिसची (Calcific Aortic Stenosis) उत्तर महाराष्ट्रातील पहिली यशस्वी शस्त्रक्रियाही इगतपुरी येथील एसएमबीटी मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲन्ड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली. डॉ. अनमोल सोनवणे व त्यांच्या टीमनेच तिथे ट्रान्स – कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (Transcatheter Aortic Valve Replacement) म्हणजेच TAVRची यशस्‍वी शस्त्रक्रिया केली होती. त्यातून 70 वर्षीय आजींना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. नागपुरातही नुकतीच अशी पहिली शस्त्रक्रिया डॉ. सोनवणे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.

एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे हृदयाची झडप अकुंचन पावणे. एओर्टिक व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून संपूर्ण शरीराकडे रक्तपुरवठा सुरळीत केला जातो. पण हा प्रवाह कमकुवत होऊ लागल्याने रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो. अशावेळी रुग्णामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. अतिशय गंभीर स्वरूपाच्या सिम्टमॅटिक एऑर्टिक स्टेनोसिसमध्ये औषधांचाही उपयोग होत नाही. त्‍यामुळे केवळ औषधांनीच उपचार करणे जीवाला धोकेदायक होते. अशावेळी ट्रान्स – कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टॅव्ही)ची शस्त्रक्रिया वरदान ठरते. शस्‍त्रक्रियेत कमकुवत झालेली झडप हायड्रा ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्हच्या पद्धतीने यशस्वीपणे दुरूस्त केली जाते. टॅव्हीच्या माध्यमातून, एऑर्टिक स्टेनॉसिसमुळे त्रस्त रुग्णांना नवी दिशा डॉ. अनमोल सोनवणे यांनी दाखविली आहे.

 अशी होते टॅव्‍ही शस्‍त्रक्रिया

टॅव्हीच्या 99 टक्के प्रकरणांमध्ये जांघेतून उपचार केले जातात. ही शस्त्रक्रिया करताना केवळ तोच भाग बधीर केला जातो. संपूर्ण कालावधीत रुग्ण संपूर्ण शुद्धीत असतो. परिणामी, अगदी थोडा वेळ आयसीयूत राहून रुग्णाला रुग्‍णालयातून लवकर घरी जाता येते. टॅव्ही प्रक्रियेत पायातील रक्तवाहिनीच्या माध्यमातून एक झडप हृदयातील जुन्या झडपेवर बसवली जाते. ही झडप पेशींपासून तयार केलेली असल्यामुळे रक्त पातळ करण्याची औषधे काही महिनेच द्यावी लागतात, असे डॉ. अनमोल सोनवणे यांनी सांगितले.

ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रियेत ऑपरेशनसाठी किमान चार तास लागतात. यात रुग्ण दगावण्याचा धोका 10 ते 12%  असतो. रुग्णाला 24 तास व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. शिवाय, रुग्ण 4 दिवस सर्जिकल आयसीयूमध्ये असतो. एकूण किमान दहा दिवस तरी रुग्ण रुग्णालयात दाखल असतो. छातीवरील टाके पूर्ण बरे होण्यासाठी 3 आठवडे आणि स्टर्नल फ्रॅक्चर बरे होण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात. या प्रक्रियेमध्ये 5 ते 6% रुग्णांमध्ये एम्बोलिक ब्रेन स्ट्रोकचा धोकादेखील असतो. त्यामुळे आज ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रियेऐवजी TAVI ची शिफारस केली जाते.  फक्त अधिक जोखमीच्या रूग्णांमध्येच नाही तर मध्यम ते कमी जोखीम असलेल्या रूग्णांमध्येही टॅव्हीची शिफारस केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content