Homeपब्लिक फिगरडॉ. दीपक सावंत...

डॉ. दीपक सावंत यांच्यावर लीलावतीत अँजिओप्लास्टी

डंम्परच्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेले राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हृदयालाही या अपघातात जबर धक्का बसल्याचे स्पष्ट झाले असून आज त्यांच्यावर लीलावती रूग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. ज्येष्ठ हृदयविकारतज्ज्ञ डॅा. मॅथ्यूज यांनी त्यांच्यावर ही अँजिओप्लास्टी केली.

काल डॉ. सावंत यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी, २० जानेवारी रोजी सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना काशिमीरा येथे महामार्गावर त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती.

आपण या अपघाताच्या गुंतागुंतीच्या आजारातून बाहेर पडून पुन्हा एकदा पालघर, मेळघाट व इतरत्र असलेले कुपोषण, बालमृत्यू, आश्रमशाळा यावर पुन्हा लवकरच काम सुरू करू. इतकेच नव्हे तर डम्पर तसेच हेवी व्हेहीकल व रॅश ड्रायव्हींगमुळे निष्पाप नागरिकांना कायमचे अंपगत्व येते, यासाठीसुद्धा आपण काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी आता व्यक्त केला आहे.

ॲम्ब्युलन्ससाठी डेडिकेटेड लेन व ग्रीन कॉरीडर असावा, डंपर व अवजड वाहनांना गव्हर्नर स्पीड लावण्याची सक्ती करावी यासह अनेक सूचना डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही केल्या आहेत. अवजड वाहने आणि डंपर ट्राफिकचे नियम पाळत नाहीत. हायवेची परिस्थिती ट्राफिकमुळे इतकी वाईट आहे की, दहिसर चेकनाका व कासा येथून येणारे २-३ रूग्ण आठवड्यात दगावतात ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला अपघात झाल्यावर वर्सोव्यावरून पोलीस ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागला. आपली ही स्थिती तर सामान्यांचे काय? असा सवाल त्यांनी केला.

मेट्रोच्या कामामुळे जनता त्रस्त आहे. रस्ते उखडले आहेत. मुंबईतील पश्चिम व पूर्व उपनगरामधील बेफाम कन्स्ट्रक्शन रोखा, मुंबईतील डंपर पहाटे २.३०पासून बेफाम रस्ता कापतात, सर्वसामान्यांचा जीव, पार्किं केलेल्या गाडया तुडवतात, याकडे जातीने लक्ष देण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत, अशा सूचनाही डॉ. सावंत यांनी केल्या आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content