Homeहेल्थ इज वेल्थ'फिंगर बोल'मध्ये हात...

‘फिंगर बोल’मध्ये हात धुण्याची पद्धत हानीकारक!

आधुनिक जीवनपद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता ‘फिंगर बोल’मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंतवैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी राज्यातील दंतवैद्यकांना ‘एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री’ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ‘मेडियुष’ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘स्वच्छ मुख अभियान’ हा चांगला उपक्रम आहे, परंतु असे अभियान हे एक दिवस राबविण्याचे काम नाही. त्यासाठी प्रत्येकदा खाणे झाल्यानंतर चुळा भरुन तोंड धुण्याची पारंपरिक पद्धत टिकवणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘फिंगर बोल’मध्ये हात बुडवून धुणे यासारखे आधुनिक जीवनपद्धतीमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यास दंतवैद्यकांनी मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

वैद्यकीय सेवा हा एक पवित्र पेशा असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले. नवनवीन औषधे व तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसेच नवनवे आजारदेखील येत आहेत. कर्णाने आपले सोन्याचे दात काढून दान दिले होते अशी पौराणिक आख्यायिका सांगण्यात येते. डॉक्टरांनी रुग्णांना देव मानून सेवा करावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

कार्यक्रमाला ‘मेडीयुष’चे सहसंस्थापक डॉ. गोविंद भताने, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, ‘ओरल हेल्थ मिशन’चे डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. विश्वेश ठाकरे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. अशोक ढोबळे, सौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्रतज्ज्ञ डॉ. संदेश मयेकर, कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.   

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content