Homeडेली पल्समुंबई विमानतळ आणि...

मुंबई विमानतळ आणि एअर कार्गोत 21 कोटींचे सोने हस्तगत

महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका गटाचा डाव उधळला आणि सोमवारी रात्री मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलात सुमारे 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने हस्तगत केले.

मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलामधील सोन्याच्या तस्करीच्या विविध प्रकरणांशी संबंधित तपासादरम्यान, काही परदेशी नागरिकांचा गट तस्करी केलेल्या सोन्यावर प्रक्रिया आणि त्याचे वितरण करत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना मिळाली होती. या तस्करी केलेल्या सोन्याची किंमत हवालामार्गे केली जात असल्याची माहितीदेखील प्राप्त झाली होती. सिंडिकेटचा डाव उधळून लावण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि संशयित भारतीय नागरिकांच्या प्रवासाच्या विशिष्ट पद्धतीवर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने काळजीपूर्वक पाळत ठेवली होती.

सोमवार, 23 जानेवारीला डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारावर, योग्य वेळ साधून आणि समन्वित कारवाईचे नियोजन केले आणि अंमलात आणली. सीमाशुल्क कायद्यांतर्गत, डीआरआय अधिकार्‍यांच्या पथकाने ज्या संशयित जागेवर तस्करी केलेले सोने वितळवणे आणि त्यावर प्रक्रिया केली जात होती, त्या जागेची झडती घेतली. या परिसराची कसून झडती घेतल्यावर, प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असलेले 36 किलोपेक्षा जास्त वजनाचे बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले. या सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे 21 कोटी रुपये इतके आहे.

या परिसराच्या प्रभारी व्यक्तीने कबुली दिली की, आपल्याला हे सोने विदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून शरीरात लपवलेल्या कॅप्सूलच्या स्वरूपात, प्रवासी बॅगमधून, कपड्यांच्या थरात लपवून तसेच विविध प्रकारच्या मशीनच्या माध्यमातून मिळाले. या व्यक्तीकडे 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकडदेखील आढळून आली. चौकशी आणि तपासादरम्यान असे आढळून आले की, या सिंडिकेटद्वारे चालवल्या जाणार्‍या कोडच्या आधारे हे सोने दररोज देशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना (तस्करांना) वितरीत केले जात होते. या तपासात प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या पुराव्यांमधून, तस्करीसाठी सोने लपवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उघडकीला आल्या.

देशात वेगवेगळ्या स्वरूपात सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या संघटनांना आळा घालण्यासाठी, योग्य पाळत ठेवून, डीआरआयचे अधिकारी सुसूत्रपणे राबवत असलेल्या कारवाईची ताकद या  कारवाईमधून दिसून आल्याचे सर्वत्र बोलले जाते. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. देशात तस्करी केलेल्या सोन्याची बेकायदेशीर आवक उघडकीला आणण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content