Homeकल्चर +मानवतेचा संदेश देणारा...

मानवतेचा संदेश देणारा सूफी संप्रदाय!

सूफी पंथ हा मानवतेच्या कल्याणाची शिकवण देणारा पंथ असून त्या दिशेने वाट दाखविणारा एक दिवा आहे. धर्म विचारात न घेता मानवता हाच धर्म मानून परस्पर प्रेमभावना वाढीस लावणारा हा संप्रदाय आहे. गुरू-शिष्य परंपरेला विशेष महत्त्व असलेल्या सूफी विचारप्रणालीची बीजे कुराणात आणि मोहम्मद पगंबरांच्या बोधवचनात आढळून येतात. सूफींचे मुख्य ध्येय सत्य, परमात्म्यात विलीन होणे हे असते. त्यामुळे सूफी संत नित्य स्मरण, समाधी, ध्यानधारणेत किंवा ईश्वरी चिंतनात म्हणजे इबादत करण्यात आपला वेळ व्यतीत करतो. सूफींना परमात्म्यात विलीन व्हावेसे वाटते. याला ‘फना’ म्हणतात. सूफी मत म्हणजे “दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे हे सांगणारे शास्त्र होय.

सूफींच्या संप्रदायांपकी चिस्ती संप्रदायाचा प्रसार संपूर्ण देशभरात अधिक झाला.  सूफींनी 11व्या शतकात दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी खानखाह स्थापन केल्यानंतर दौलताबाद, गुलबर्गा, बिजापूर, गोवळकोंडा, पेनुकोंडा, त्रिचनापल्ली येथे सूफींची केंद्रे प्रस्थापित झाली. सूफीमधील उपपंथ वेगवेगळ्या संतांच्या अनुयायांनी स्वतंत्रपणे चालविले. सूफी संतांना सामान्य मुसलमान जनतेत अफाट लोकप्रियता मिळाली. संतांच्या समाध्या (दर्गे) ही तीर्थक्षेत्रे बनत चालली.

आजदेखील भारतात अनेक खानकाहमधून मानवतेची शिकवण दिली जाते. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईतील अॅण्टॉप हिल येथील मेहफिल–ए-जहांगिरिया. सूफी फैझुल हसन शाह मजिदी उर्फ सूफी बाबा यांच्या विचार आणि शिकवणीतून त्यांचे अनेक अनुयायी देशभर पसरले आहे. यात केवळ मुसलमानच नव्हे तर इतर धर्मीयदेखील भक्तीभावाने इथे येतात. अब्दुल करीमबरोबर अरविंद कुमार, भोलानाथ-सिंग-ठाकूर यांच्यासमवेत खालिद खान ऐकमेकांशी मैत्रीच्या स्नेहाचे प्रतिक म्हणून दिसून येतात. सूफीबाबा उर्फ सूफी फैजूल हसन शाह मजिदी यांचे वडिल ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांचे जगभर शिष्य आणि अनुयायी होते. त्यांनीदेखील दिलेल्या मानवतेच्या शिकवणुकीमुळे आज हा वारसा त्यांचे पुत्र सूफीबाबा चालवित आहेत.

हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांना प्रेषित महंमद पैगंबर यांच्यापासूनच्या सूफी परंपरेत ४५वे धर्मगुरूचे स्थान आहे. त्यांचे वडिल लहानपणीच निवर्तल्यामुळे त्यांचा सांभाळ आईने केला. बालवयात खीर, हलवा विकणे, खेळणी बनवणे असे छोटे उद्योग करून त्यांनी उदरनिर्वाह करायला प्रारंभ केला. हे करीत असताना त्यांचा लोकसेवेकडे कल वाढू लागला. समोरच्या व्यक्तीला त्यांच्या गरजेनुसार मदत ते करीत. संपूर्ण मानव जातीची होत असलेली दुरवस्था व त्यांचे दुःख यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी तसेच एक फुंकर मारण्यासाठी काय करता येईल, याच विचारात ते असायचे. ते खऱ्या अर्थाने स्थिरावले ते अॅण्टॉप हिलच्या त्यावेळेच्या एका टेकडीवर.

त्यांच्या पश्चात सूफी बाबा उर्फ सूफी फैजुल हसन शाह मजिदी यांचाही स्वभाव आणि सर्वांबाबतची आपलेपणाची भावना पाहून भोवतालची मंडळी त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागली. बाबा कुठलेही अवडंबर न माजवता त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करतात. मुंबई, महाराष्ट्रासह भारतातील सर्व प्रांतातील मंडळी येऊ लागली आहेत. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबा हे एक मानसिक आधार वाटू लागले. मेहफिल-ए-जहांगिरिया हा भारतातील सूफीवासियांसाठी एक प्रमुख केंद्र बनले असले तरी त्याची केवळ हीच ओळख नाही, तर इथे इतर मंडळीही श्रद्धेने येत असल्यामुळे सर्वधर्मीयांचा आश्रम म्हणजे मानवतेचे केंद्र ठरले आहे. त्याच्या पायऱ्यांवर तसे लिहलेले आढळते.

राष्ट्रीय एकता, मानवतेचा सौहार्दपूर्ण वर्तन, आपला जन्म हा सार्थकी लागावा, यासाठी चांगले काम करणे, सर्व धर्मीयांशी आपुलकीने आणि स्नेहाने वागा अशा आशयाचे संदेश फलक लिहिलेले आहेत. प्रतिकूल अशा सामाजिक परिस्थितीतदेखील त्यांनी समाजासाठी दिलेले योगदानदेखील महत्त्वाचे राहिलेले आहे. त्यांच्या कार्याला वेगवेगळी रुपे होती. अल्लाहशी संपर्क साधण्याचे माध्यम म्हणजे सूफी बाबा आहेत. ते आपल्या शिष्यांची पुरेपूर काळजी घेतात. श्रीमंतांना गरीबांचा उद्धार किंवा पुनर्वसन करण्यासाठी आग्रह धरतात तर काहींना आपल्या पदरचे देऊन स्वावलंबी होण्यास मदत करतात. आपल्या आरोग्याशी हेळसांड करणाऱ्यांना धाक दाखवतात. इथे येणाऱ्यांनी निराश होऊन जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येकाची इच्छा, आकांक्षा त्यामुळे इथे पूर्ण होताना दिसून येते. अनेकांना आत्महत्त्या करण्यापासून बाबांनी परावृत्त केले आहे. मानसिक आधार दिला आहे. ईश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात असतो, खुद को पहचानो, खुदा मिल जायेगा, असे त्यांचे विचार आहेत. हाच संदेश आणि प्रेरणा इथून प्रत्येकाला मिळत असते.

मेहफिल – ए- जहांगिरिया या ठिकाणी होळी आणि कव्वाली आणि बसंत एकत्र साजरे होतात. फारशी, उर्दू आणि संस्कृत कव्वाली गायलेली ऐकायला मिंळते. बाहेरच्या दुनियेत मोठ्या हुद्द्यावर असलेली अनेक शिष्यमंडळी इथे आल्यानंतर एकत्रित श्रमदान आणि स्वयंसेवक म्हणून काम करताना दिसतात. कुठलाही भेदभाव दिसून येत नाही. असंभव गोष्टी संभव होतात ते याच ठिकाणी. त्यामुळेच अण्टॉप हिलचे हे मेहफिल-ए-जहांगिरिया मानवतेच्या कल्याणाचे केंद्र बनले आहे. संत कबीर यांचे दोहे या ठिकाणी चपखल बसतात. ते असे की…

गुरू गोविंद दऊ खडे, काके लागू पांय,

बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय।

गुरू बिन ज्ञान न उपजै गुरु बिन मिले न मोष,

 गुरु बिन लखै न सत्य को गुरु बिन मिटै न दोष।

गुरू आणि ईश्वर समोर असताना गुरूचा सन्मान करा. कारण त्यांच्यामुळे ईश्वरापर्यंत पोहोचता येते, त्याची अनुभूती घेता येते. असाच संदेश सूफी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाला येतो.

लेखक- अदनान कुरेशी,

मेहफिल – ए – जहांगिरिया

संपर्क- 9967610135/9869042349/9323361261

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content