Homeएनसर्कलएटीएल मॅरेथॉन 2022-23साठी...

एटीएल मॅरेथॉन 2022-23साठी मागवण्यात आले अर्ज!

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अर्थात अटल नवोन्मेष अभियानाने (एआयएम) अटल टिंकरिंग प्रयोगशाळा कार्यक्रमाअंतर्गत, ‘एटीएल मॅरेथॉन 2022-23’ या महत्त्वाच्या अभिनव संशोधनविषयक स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

‘एटीएल मॅरेथॉन’ ही भारतभरातील युवा संशोधकांसाठी सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय पातळीवरील नवोन्मेष स्पर्धा आहे. या स्पर्धेतील स्पर्धक त्यांना योग्य वाटेल त्या सामाजिक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी, वर्किंग प्रोटोटाईप किंवा किमान व्यवहार्य उत्पादनाच्या (एमव्हीपी) स्वरूपातील अभिनव उपाय शोधून काढू शकतात. 

“भारताकडील जी-20 समुहाचे अध्यक्षपद” ही यावर्षीच्या एटीएल मॅरेथॉनची संकल्पना आहे. जी-20 समुहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यावर्षी भारताकडे असल्यामुळे, अटल नवोन्मेष अभियानाने यावर्षी स्पर्धेसाठी, संबंधित लक्षित क्षेत्रांमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या समस्यांवर जी-20 समुहाच्या कार्यकारी गटाने दिलेल्या प्रोत्साहनपर शिफारसींवर आधारित प्रश्नावली तयार केली आहे.

विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या जागतिक प्रश्नांवरील उत्तरे शोधून केवळ अधिक उत्तम भारत उभारणीच्या दृष्टीनेच नव्हे तर अधिक उत्तम विश्वासाठी अभिनव संशोधन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी प्रचंड संधी निर्माण करणे ही यामागची संकल्पना आहे. यावर्षीच्या स्पर्धेत, विहित संकल्पनांखेरीज इतर क्षेत्रांवर आधारित प्रकल्प सादर करण्याचा पर्यायदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांतील समस्यांशिवाय स्थानिक पातळीवरील इतर सामाजिक समस्या सोडविण्यासाठीदेखील उपाय सुचविता येतील.

एटीएल मॅरेथॉन 2023 स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याचा प्रवास

एटीएल मॅरेथॉन 2022-23 या स्पर्धेतील उत्तरे देण्यासाठी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचादेखील वापर करता येणार आहे. या स्पर्धेची माहिती स्पर्धकांना इंग्रजी तसेच हिंदी भाषेतून देण्यात येईल आणि त्यांना त्यांच्या प्रवेशिकादेखील या दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून सादर करता येतील. या स्पर्धेतील विजेत्या संघांना विद्यार्थी नवोन्मेष कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील प्रमुख कॉर्पोरेट संस्था तसेच इनक्युबेशन केंद्रांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. तसेच या विजेत्यांना नीती आयोगाच्या एआयएमकडून प्रमाणपत्रे आणि इतर अनेक आकर्षक संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

स्पर्धेची सुरुवात करून देताना, एआयएमचे अभियान संचालक डॉ. चिंतन वैष्णव म्हणाले की, आपणा सर्वांसाठी हा अत्यंत उत्साहवर्धक क्षण आहे. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा यासाठी त्यांनी उत्तेजनदेखील दिले.

खालील क्षेत्रांतील समस्यांवर विद्यार्थ्यांना उपाययोजना सुचवायच्या आहेत:

1.  शिक्षण

2.  आरोग्य

3.  कृषी

4.  पर्यावरण आणि हवामान शाश्वतता

5.  विकास

6.  डिजिटल अर्थव्यवस्था

7.  पर्यटन

8.  इतर (तुम्ही स्वतःची समस्या मांडून त्यावर उपाययोजना सुचवू शकता)

या स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: https://innovateindia.mygov.in/atl-marathon-2022/

Continue reading

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...
Skip to content