Homeपब्लिक फिगरमी मंत्रालयात येणार...

मी मंत्रालयात येणार नाही.. आणि अधिवेशनही घेणार नाही!

मी मंत्रालयात येणार नाही. मी अधिवेशन घेणार नाही. माझ्या पक्षाविषयी बोललात तर मुंडण करू. केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करणार, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले हे ठाकरे सरकार आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी राज्यातल्या आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीबद्दल केली.

असंवेदनशील सरकार

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 50 हजार देऊ म्हणणाऱ्या सरकारने 10 हजारांची घोषणा केली. तेही देऊ शकले नाहीत. एफआरपीसाठी आंदोलने झाली. पण हे सरकार तीन टप्प्यात एफआरपी नको म्हणते. कोरोना काळात देशाचे अर्थचक्र ज्या शेतकऱ्यांनी चालवले त्या शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडली जात आहे. महिला अत्याचाराच्याबाबतीत तर अत्यंत असंवेदनशीलपणा दिसतो. गेल्या सात महिन्यात मुंबईत 550 बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले. बाकी पक्षाचे मंत्री, युवा संघटनेचे पदाधिकारी, मंत्री राजीनामा हे विषय सगळ्यांना माहित आहेच.. शक्ती कायदा कुठे आहे? 11वीचे प्रवेश कधी संपणार? मराठा समाजाचे आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. भूमिका काय? ओबीसी राजकीय आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. सरकार काय करणार?, अशा प्रश्नांचा भडिमारही त्यांनी केला.

अधिवेशन

फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्याभोवतीच फिरणारे सरकार

आघाडी सरकार फक्त “पुत्र, पुत्री आणि पुतण्या” याभोवतीच फिरणारे आहे. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा, या नाटकाप्रमाणे तीन पक्षांचा तमाशा आहे. सत्ता, संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनताकेंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या, याभोवती केंद्रित झालेले आहे.

अडचण काहीच नाही. एखाद्याला आपला पुत्र चांगले काम करावा, मोठा व्हावा असे वाटते. त्याच्या नेतृत्त्वामध्ये पुढचे यश मिळाले पाहिजे. ही पायाभरणी करायला एखाद्याला वाटले तर त्यात चूक असू शकत नाही. आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे यात चूक नाही, पण राज्यात निर्णय काय घेतले हे पाहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचे दिसते. राज्याची जगासमोर जी प्रतिमा गेली ती पब, पेग, पार्टी आणि पेग्विन अशीच दुर्दैवी गेली. मग जेव्हा मुंबईकर लोकल ट्रेन सुरू करा, असे म्हणत होते तेव्हा पब आणि बार सुरू केले गेले. जेव्हा मंदिर उघडा अशी मागणी झाली तेव्हा मदिरालाय उघडी केली, असे निर्णय पुत्रप्रेमाने झाले, असे ते म्हणाले.

सुपुत्रीच्या प्रेमापोटी गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांना बसव., त्यानंतर महाराष्ट्राची बदनामी करणारे वसुली, मटका किंग, बुकी यांच्यासोबत व्यवहार, पोलीस दलात गटबाजी, बदल्यांमधील भ्रष्टाचार असे चित्र समोर आले. पुतण्या प्रेमाने त्यांना पुतण्याला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान द्यावे लागले. पुतण्याचे काय उद्योग सांगावे? 1 हजार कोटींची बेनामी संपत्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी उघड केली. कुठून आली संपत्ती? सहकारी कारखाना उघडायचा, सरकारकडून जमीन, वीज सगळे सवलतीत मिळवायचे, शेतकऱ्यांकडून पैसा घ्यायचा, पण कारखाना तोट्यात दाखवायचा, बँकेने मग लिलाव करायचा, मग तोच कारखाना पुतण्याने विकत घ्यायचा.. असे पुतण्याचे नवीन उद्योग समोर आले, असेही शेलार म्हणाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content