HomeArchiveअ‍ॅक्वा..

अ‍ॅक्वा..

Details
अ‍ॅक्वा..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संदीप अंभोरे, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

राज्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे आजच्या घडीला पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भागात आजच नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. खरं आव्हान तर पुढील काळात असणार आहे. कडक उन्हाच्या झळा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य याचा माणसांसोबतच मुक्या जनावरांनाही त्रास होणार आहे. शेतकर्‍यांना गुरंढोरं कशी जगवावी याची चिंता आजच सतावत आहे. जंगलातील प्राणी, पशु, पक्षी यांचा तर विचारच न केलेला बरा. ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या या भीषण समस्येचा हा घेतलेला धांडोळा..

मादेव मावसा, चाला आना बरं हो पयशे! बंम नोटा हायेत वाटते राजा तुमच्याजोळ! पेवात तं तिजोरी दाबून ठेवेल नाई ना हो बावाजी! इतला टाईम लाऊन रायले! इतल्या टायमात तं अमेरीकीतून पयशे आले असते राजा! असं असते का कुठी! मलेबी कामं हायेत ना! दोन तीन गावात पानी घीऊन जा लागते आजून! नसतीन पयशे तं तसं सांगा!

तसं नाई ना बे शाम्या! तू तं कईबी निरा घोळ्यावरच येतं बे! आमासक तं थाबत जाय बावा! तुयी मावशी तं अशी बोहारी हाय गळ्या की, कईच काई सापळत नाई तिच्या हातचं! तिले तरी सकाऊनच वावरात जायाच्या आंधी मन्लं की, तो शाम्या येईन अ‍ॅक्वावाला! त्याले पान्याचे पयशे द्या लागतीन आज! हप्ताभर्‍याचे हायेत मन्लं त्याचे पयशे! अबे ठुयतो मने ना मले, अन आता दिसून नाई रायले! सांग आता काय कराव मानसानं!

मीच का तुमच्या मांगे लागलो व्हतो राजा. आपला रोजचाच धंदा हाय. तुमी का सकायच गाव सोळून थोळीच जाऊन रायले काई!
कोनाचे पयशे आंगावर असले की, मलेच तं गमत नाई बे लेका! नसतीन तवा काई वाटत नाई पन जोळ असूनशानी जर तू वापीस चाल्ला माया घरुन, तं मंग माया मनाले लान खराब वाटून रायलं अशीन, तूच सांग बरं! समजा तुनं सकायपासून पानी बंद करुन टाकलं आमचं तं मंग कोन्या भावात पळीन ते आमाले! कोनी घोटभर पान्याले उभं नाई करत बाबू! तुया अ‍ॅक्वावरच तं सरं गाव जित्तं हाय असच मना लागीन आता!
तसं काई नाई हो राजा मावसा, त्या भगवंत परमात्म्याच्या पुळे कोन जाते हो! त्याच्याच मनात अशीन आपल्या हातून शेवा घळोयाची, मनून आपूनबी थळीतल्या चार पाच गावायची तान भागोऊन रायलो! सरा हिसोब तो देवच लिवते हो! त्याच्याजोळच असते सर्‍यायची लिखापळी! आपून सर्वे लोकं त्याच्या हुकमाचे ताबेदार हावो. तो इधाताच घेते आपल्याजोळून कामं करुन! जाऊ द्या ते, चाला जातो. तुमच्या जोळच्या गोठी काई सरत नाईत बावा, मले भक्कम कामं हायेत. पान्याचे पयशे जमा करुन शेगावले जा लागते बँकेत, आपल्या छोटा हत्तीचा हप्ता भरा लगत ना या मयन्याचा! नाई भरसान कदी तं दुसर्‍यादिशीच ते घरी येतात सायाचे बँकेवाले! कुठी बसता त्यायच्या नांदी लागत. मनून पयशे जमा कर्‍याची घाई हाय मले, नाईतं काहाले इतला मांगं लागलो असतो मी तुमच्या हो राजा!
मादेवबॉ, काय मन्ते हो गळी शाम्या! लय वाखोळचा बळबळ करुन रायला लेकाचा, मनून मन्लं काय हाय तं पाऊन येवाव! काय चालू व्हतं बावा इतलं तुमचं दोघायचं!

काय अशीन हो राजा, तुयशीरामभाऊ! तो आला की समजून घ्याचं की पयशायचंच काईतरी अशीन मनूनशानी! अ‍ॅक्वावाला हाय ना तो गळी, सोपी हाय का? इस रुपये बॅरलनं इकते ना गळी त्याच्या इरीचं पानी! चार-साहा मयन्यातच तं एकाचे दोन छोटे हत्ती केले पठ्ठ्यानंं पान्याच्या पयशावर! निरा पयशायच्या गड्ड्यायवरच झोपत अशीन तं काय सांगाव गळी रातच्यानं!
काय सांगाव बॉ, झोतपयबी अशीन! आता पान्याचाच पयसा हाय! पन काहो राजा, प्याचं पानी कदी इकत घ्या लागीन असा इचार केल्ता तुमी?
नाई हो तुयशीराम भाऊ! बाराय मयने आपल्या मन नदीले पानी रायत जाय! दोनीबी कराडा डचाडच भरुन रायत जात नदीच्या! कवाच असं नाई झालं की, पान्याची टंचाई आली अशीन अवघ्या थळीतल्या गावायले! काई लय नाई, पंधरा इस वर्साआंधीची गोठ अशीन! तवा तं नळ कहाले मन्तात तेबी माईत नोतं! दोन चार हापशा व्हत्या गावात, नाई असं नाई, पन नदीचंच पानी भरपूर असल्यावर कोन जाते हो बॉ त्या हापशीवर कंबंळलं दुखव्याले! रोज सकाऊन, सद्याकाई बंदं गाव नदीच्या रस्त्यानं दिसत जाये! प्याचं, वापर्‍याचं सर्वच पानी नदीचचं असत जाये! पानी इतलं सुध्द व्हतं की, त्याले काईच कर्‍याचं काम नोतं. आता तं बापा कोनता अ‍ॅक्वा का फॅक्वा घ्या की, काईबी घ्या, डाक्टर मन्तातच पानी तपवून पेत जा! त्या काळात तं पानी ना तपव्याचं काम व्हतं ना गावून घ्याचं! बिनघोर प्या, काईच नोतं व्हतं! बिमार्‍या फिमार्‍या काईच नोतं ना हो तवा!

खरंच हाय हो राजा मादेवबॉ! आता तं जीव द्याले घोटभर पानी नाई रायलं नदीत! दहा पंधरा वर्षे झाले असतीन म्या तं नदीचे दोन काठ भरुन पानीबी पायल नाई! कोळल्ली ढन्न पडेल हाय नदी! भयान व्हयेल हाय सरी थळी! पयले तं दिवसदिवसभर नदीत रायलं तरी गमत जाये मन्लं! आता तं काईच गमत नाई राजा! पावव नाई वाटत नदीच्या इकळे इतली भंगली! त्यात आता रेतीवाल्यायनं तं हालतच केली नदीची. जेशीबीनं गड्डे पाळूपाळू रेती खंदतात अन इकतात. पुरी नदी टाकली खराब करुन राजा, या लोकायनंं. पयले नदीच्या काठावरची माती इकली इट भट्टीवाल्यायले अन आता रेती इकून रायले! त्याच्याचनं नदीचं पयलं रुपच हारपलं राजा!

नाईतं कायतं हो, मानूस हा जीवच तसा हाय भाऊ! त्याले फुकटचं पानीबी नाई पुरत राजा, बाकीच्या गोठी तं बोल्यालेच नाई पुरत! मनून तं आपल्यावर अशी पाळी येल हाये, तुमाले प्याचं पानीबी आता इकत घ्या लागून रायलं. इस रुपये बॅरलनं! आजून तं दिल्ली लय दूर हाय तुयशीरामभाऊ! उनाया लाग्याचा हाय आजून! आजच प्याच्या पान्याचा वांदा हाय, तोबी मानसाच्या बरं! जनवारायचा तं आजून आपूनबी इचारबी नाई करून रायलो. त्यायचं काय व्हयीन. ढोरंवासरं, जीव, जंतू, पशुपक्षी सगळ्यायलेच पानी लागते की नाई! त्यायचा इचार कवा कराव आपून. त्यायचा इचार कोन करीन आपल्याले तं बाकीच्यायचा इचार कर्‍याले टाईमच नाई. आपून आपल्यायातच गुतेल हावो. एका छोटा हत्तीचे दोन कशे व्हतीन अन एका एकराचे दोन एक्कर कशे व्हतीन हेच पायते मानूस!
तुमाले काय सांगू राजा मादेवबॉ! वावरात गेलं की निरा मोर, हरणा पानी नाई भेटत मनून मरतात हो! पुळे तं कडक उनाया बाकी हाय आजून, काय व्हईन तं हो बॉ मुक्या जनवारायचं! अरे त्याच जनवारायचं नाई बॉ, आपले घरचे ढोरंवासरंं बी जगव्याचं टेन्शन येल हाये मले तं मयनाकभर पुरीन पानी ढोरावासरायले! पुळचे दिवस कशे काळाव काय मालून सायाचे!

तुयशीरामभाऊ, आपून टेन्शन घीऊन काई व्हनार हाय थोळीच काई! जे तकदीरात अशीन ते व्हईन, त्याले कोन रोखू शकते. रोख्याचचं अशीन तं पावसायाचं वाऊन जानारं पानी रोखलं पायजे! पानी अडोलं पायजे, जमीनीत जीरोलं पायजे, आपून जर आता पानी अडोलं, जमिनीत मुरोलं तं पुळच्या आपल्या पिळ्या सुखानं रायतीन, नाईतं आपून जे भोगून रायलो त्याच्याऊन खतरनाक दिवस त्यायच्यावर येतीन, हे मी शंभर रुपयाच्या बाँडवर लिऊन देतो कधीना! नाईतं ध्यानात ठुयजा की, मादेवबॉनं काय मन्लं व्हतं!”
 
“संदीप अंभोरे, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content