Details
राजकारणाचा `समर्थ वारसा’ चालविणाऱ्या भगिनी!
01-Jul-2019
”
योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. हां हां म्हणता पाच वर्षे होत आली. निवडणुकांचे ढोल, नगारे, बिगुल वाजायला लागले. रणशिंग फुंकण्यास प्रारंभ झाला. मार्च-एप्रिल 2019 मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता असून फेब्रुवारीत भारत निवडणूक आयोग याबद्दलची अधिकृत घोषणा करण्याचा अंदाज आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. 10-15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला सत्तेवरून खाली खेचून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने संपुआला पुन्हा सत्तेवर येऊ न देण्यासाठी तर रालोआला सत्तेवरून खाली खेचून पुनरागमन करण्यासाठी संपुआने राजकीय पवित्रे, आडाखे आखायला सुरूवात केली आहे. पूर्वी काँग्रेसच्या विरोधात सारे विरोधक एकवटत असत. मग त्यात डावे-उजवे सारे एकत्र येत. पण आता 2014 मध्ये झंझावात उभा करणाऱ्या नरेंद्र मोदींना खुर्चीवरून हटविण्यासाठी आचार-विचार बासनात बांधून समविचारी’च्या गोंडस नावाखाली महागठबंधन बांधण्यासाठी आटापिटा चालविला आहे. अर्थात तिसरी आघाडी अस्तित्त्वात येऊ शकत नाही आणिमहागठबंधन’ला मायावती-मुलायम-ओवेसी-आंबेडकरांनी आधीच सुरूंग लावला आहे.
तीन राज्यात सत्तेवर आल्यामुळे राहुल सेनेला फुरफुरी चढली असून 1947 नंतर सातत्याने सत्तेवर राहूनही, हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करूनही या शेतकऱ्यांना एका लाल पैशाचीही कर्जमाफी करू न शकणाऱ्या काँग्रेसने मोदींचा झंझावात आणि 2014 मध्ये जबरदस्त चपराक खाल्यानंतर आता कर्जमाफीचे निर्णय घेऊन स्वतःच्या टिपऱ्या बडवित आहेत. 2008 मध्ये 70 हजार कोटींची कर्जमाफीचे ढोल बडविणाऱ्या काँग्रेसी नेत्यांना भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देता आलेले नाही. किंबहुना महाराष्ट्रात 10 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची नावे सांगू शकली नाही. याऊलट महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत सुमारे 60 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कमही जमा करून ‘करुन दाखवले’ हे अभिमानाने सांगण्याचे काम अर्थात हे कर्तव्य भावनेने केल्याचे फडणवीस सरकार सांगते.
15 वर्षे महाराष्ट्रात चुकून सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांचा भ्रमनिरास करूनही गेल्या साडेचार वर्षांत फडणवीस सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊनही केवळ बोटे मोडण्याचेच किंबहुना खोटे बोल पण रेटून बोल’ असा खाक्या दाखवून देण्यास सुरूवात केली आहे. अशोक चव्हाण-पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार-अजित पवार यांच्या जोडीने महागठबंधन बनवण्याच्या सुरू केलेल्या प्रयत्नात आंबेडकर, ओवेसींनी खोडा घातला आहे. त्यामुळे पवार-चव्हाण यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा वाढू लागल्या आहेत. महाराष्ट्रात सर्व विरोधक एकत्र आले तरी त्यांना देवेंद्र फडणवीससारख्या बलशाली पैलवानाचासामना’ करावा लागणार असल्याची चर्चा आताच सुरू झाली आहे.
या सर्व राजकीय गदारोळात एक चांगली बाब पाहयला मिळाली. विविध वाहिन्यांवर निरनिराळे कार्यक्रम होत असतात. वृत्तवाहिन्यांवर राजकीय चर्चा होत असतात. वृत्तवाहिन्यांवर राजकीय चर्चा झडत असतात. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून लोकसभा 2019 च्या निवडणुकांच्या दृष्टीने काही आवश्यक सूचना केल्या. ज्या महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात अत्यंत उपयुक्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अत्यंत सामंजस्य, समन्वय, सहकार्य आणि सौदार्हाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. राममंदिर आणि हिंदुत्व हा या दोन्ही पक्षांना जोडणारी रेशमी गाठ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले तर भाजपाचे माजी अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हे वातावरण अधिक चांगले बनविण्यासाठी काही मौलिक सूचना करताना वाचाळवीरांना योग्य ती समज’ दिली आहे. नाना पाटेकर यांच्या समवेत नाम फौंडेशन या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श उभा करणारे अभिनेते मकरंद अनासपुरे सध्या ‘अस्सल पाहुणे’ घेऊन येतात आणि इरसाल नमुनेपेश’ करतात. गेल्या दोन दिवसात मकरंदभाऊंनी पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या ग्रामविकास, महिला- बालकल्याण मंत्री आणि खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांमधून अवघ्या महाराष्ट्राला राजकारणाचा समर्थ वारसा चालविणाऱ्या संयमी, संस्कारी, परिपक्व, प्रगल्भ भगिनींचे दर्शन घडले. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे अनुक्रमे अंबाजोगाई आणि बीडचे भाजपा लढाऊ नेते. वसंतराव भागवत यांच्या मुशीतून तयार झालेल्या महाजन आणि मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला जबरदस्त प्रभाव पाडला. महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना-भाजपाची युती हिंदुत्वाच्या आधारावर घडवून महाराष्ट्राच्या राजकारणात एक इतिहास’ निर्माण केला. तर मुंडे यांनी संघर्षयात्रेच्या माध्यमातून आपले लोकांमधून पुढे आलेले नेतृत्त्व सिध्द केलं. 2006 मध्ये प्रमोद महाजन यांनी इहलोकाची यात्रा संपविली. तर 2014 च्या महायुतीचा झंझावात निर्माण करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांनी 3 जून 2014 रोजी भारताच्या राजकीय पडद्यावरुनएक्झिट’ घेतली. या घटनांमुळे भाजपावर जबरदस्त परिणाम झाला, तद्वतच शिवसेना-भाजपा युतीसही मोठा फटका बसला.
या धक्क्यातून सावरलेल्या पंकजा अमित पालवे यांनी महाराष्ट्रात पंकजा गोपीनाथ मुंडे बनून फिनिक्स भरारी घेत रडायचं नाही, आता लढायचं’ हा निर्धार केला. प्रमोद महाजन यांची सुस्वभावी कन्या पूनम आनंद राव यांनीही पूनम महाजन ही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रमोद महाजन यांचा मतदारसंघ इशान्य मुंबई. पण, पूनम महाजन यांनी सुनील दत्त-प्रिया दत्त यांच्या प्रभावशाली उत्तरमध्य मुंबई हा मतदारसंघ बांधून त्यांचे प्रतिनिधीत्व संसदेत करताना स्वतःची एक चांगली ओळख निर्माण केली. मकरंद अनासपुरे मराठवाड्याचे. पंकजा मुंडे आणि पूनम महाजन याही मराठवाड्याच्या. पण पूनम महाजन यांचे संपूर्ण शिक्षण चेंबूरपासून बालमोहन विद्यामंदिरात झाल्यामुळे त्या पक्क्या मुंबईकर आहेत. पण मकरंद अनासपुरे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि पूनम महाजन या दोघी भगिनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकत्र आल्या आणि त्यांनी जी मनमोकळी चर्चा केली आणि उत्तरे दिली, त्यातून खानदानीपणा, शालीनता, सुसंस्कारी, संयम, परिपक्वता व प्रगल्भताच ओतप्रोत भरलेली दिसून येत होती. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरे परिवाराशी असलेले कौटुंबिक नाते पंकजा व पूनम यांच्या बोलण्यातून पुरेपूर दिसून येत होते. प्रमोद महाजन यांच्यावर हिंदुजा रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना बाळासाहेब ठाकरे त्यांना पाहयला आले आणि त्यांनीप्रमोद उठ! तुला उठलंच पाहिजे!’ ही घातलेली साद जेव्हा पूनम महाजन यांनी सांगितली तेव्हा सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. पूनम महाजन निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हा मातोश्रीवर येताच त्यांची ओटी भरून, त्यांना ओवाळणी देताना ही प्रमोदजींची कन्या आहे हीचा मळवट भरा, असे सुटलेले फर्मान पूनम महाजन यांनी कथन केले तेव्हा तर जुन्या स्मृती जाग्या झाल्या आणि मन भरून आलं.
उद्धव ठाकरे यांची आवडणारी गोष्ट म्हणजे आम्ही तासनतास गप्पा मारतो, वाईल्ड लाईफ’वर विशेष करून फार गप्पा असतात. बाळासाहेबांचा हा संयमी संस्कारी पुत्र आहे असं सांगताना पूनम महाजन यांनी दगदगीत उद्धवदादाने स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे अधारेखित केले. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांनी गोपीनाथरावांसमवेत संघर्ष केला तेव्हा मी गोपीनाथरावांच्या बरोबरीने उभी होते आणि म्हणूनच ते माझं सुदैव अन्यथा मुंडेसाहेब एकाकी पडले असते याची याद करून दिली आणि धनंजयवर व्यक्तीगत किंवा कुणावरही आपण व्यक्तीगत आरोप केले नसल्याचे आवर्जून नमूद करतांना धनंजयचा अभिनय हे त्यावेळेला आवडणारी आणि आता खटकणारी बाब असल्याचे सांगितले. गोपीनाथरावांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबध्द असल्याचे नमूद करतानाच आता दसरा मेळाव्यात सावरगावच्या भगवानगडावर सभा घेणे व लोकांमध्ये लोकांसाठी काम करणे यास प्राधान्य राहील आणि सध्यातरी लोकसभेचा विचार नसल्याचे सांगून राज्याच्या राजकारणात राहण्याचे स्पष्ट केले. पंकजा मुंडे आणि पूनम महाजन या दोघांनी अटलबिहारी वाजपेयी ही इन्स्टिट्युटशन आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून परखडपणे सांगताना सुषमा स्वराज यांच्या स्वभावाचा गुणगौरव केला. शिवसेना ही आपली वाटत असल्याचे या दोघा भगिनींनी स्पष्ट केले. भाजपा आणि शिवसेना या दोघांचाहिंदुत्व’ हा जोडणारा महत्त्वाचा धागा/आधार असल्याचे सांगताना आपल्या कार्यकर्तृत्त्वामुळे आपल्याकडे घराणशाहीच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी सुयोग्य वारसा चालविणाऱ्या म्हणून आपली स्वतंत्र ओळख आहे, हे मान्य करावे ही अपेक्षा संबंधितांकडून व्यक्त करण्यात आली. राजकारण वाईट आहे, राजकारण ही दलदल आहे, अशा चर्चांमध्ये पंकजा मुंडे आणि पूनम महाजन यांनी राजकारणाचा समर्थ वारसा चालवताना संयम, सुसंस्कार, परिपक्वता, प्रगल्भता दाखवून दिली, हेच निःसंशयपणे दिसून येते. या भगिनींनी दाखवून दिलेला आदर्श राजकारणातल्या अन्य परिवारांनी समोर ठेवावा आणि लोकशाही सुदृढ, निकोप, बलशाली निष्कलंक, निर्भेळ करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठीच ‘सबका साथ, सबका विकास’ अवलंबले तर निश्चित ‘अच्छे दिन’ येतील आणि सुसंस्कारी व्यक्ती राजकारणात येऊन राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होईल. खरे ना?”
“योगेश वसंत त्रिवेदी