HomeArchiveअण्णा पाहिजेत, पण..

अण्णा पाहिजेत, पण..

Details
“अण्णा पाहिजेत, पण..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी केलेल्या २ जी, ३ जी, कोळसा खाणीचा लिलाव आदी भ्रष्टाचारांची प्रकरणे गाजत होती. लोकांमध्येही जबरदस्त सरकारविरोधी चीड होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये सहानुभूती होती. केंद्र सरकारमध्ये एवढा भ्रष्ट्राचार होत असताना डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंह गप्प का? ते भ्रष्ट्राचारविरोधात कारवाई का करत नाहीत? अशी लोकांमध्ये त्यांच्याविषयी चीडही होती. परंतु भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे हात फार लांब असतात. लांब असणे म्हणजे त्यांचे हात राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेले असतात म्हणूनच कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराला राजकीय आसरा मिळत असल्याने सरकारविरोधी लोकांनी बेंबीच्या देठापासून ओरडून काहीही उपयोग नाही, हीच खरी लोकांची मानसिकता तयार झालेली असते. मात्र, त्यावेळी अण्णा नावाचा हजारातला एक माणूस पुढे आला. त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंम्मत तत्कालीन सरकारने दाखवली आणि ते लोकांचे खरे हिरो झाले.

“मै अण्णा हूँ” अशा टोप्या घालून लोक तत्कालीन सरकारवर प्रचंड नाराज झाले होते. त्यावेळी खूषमस्कऱ्यांचीही झुंबड अण्णाभोवती जमा लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अण्णांच्या उपोषणाच्या जागी कामाला लागले. ज्यांना निवडणुकीत काही उमेदवार निवडून आणावयाचे होते त्यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाचे फलित आहे. त्याशिवाय सनदी अधिकारी किरण बेदी अण्णांच्या मागे उभ्या होत्या. तेही तिरंगा झेंडा हातात घेऊन उजव्या-डाव्या बाजूला हलवून आम्ही भ्रष्टयाचाराचे खरे विरोधक अशाप्रकारे देशवासियांसमोर स्वतःची प्रतिमा तयार करत होत्या. त्यांना मोदी सरकारने राज्यपाल करून भ्रष्टाचारविरोधकांची म्हणजेच अण्णाच्या गोटातील उपद्रवी किरण बेदी यांना जाळ्यात ओढले.

काँग्रेस सरकारच्या कालावधीत लोकपाल नेमण्यासाठी अण्णांचा आग्रह मान्य करण्यात आला त्यानंतर अण्णांना पाठींबा देणारे भाजपाचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मोदी सरकारला पाच वर्षे होत आली परंतु केंद्र सरकारने पाच वर्षांत लोकपाल नेमण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. वैशिष्टय म्हणजे अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला पाच वर्षांत ३५ वेळा पत्रे लिहून स्वतःची जबाबदारी पार पाडली आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत उपोषणाला न बसता राळेगणसिद्धी हे छोटेसे गाव निवडले. अण्णा हजारेंवर दिल्लीऐवजी राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याची वेळ का आली, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि राग होता. नेमके त्याचवेळी अण्णांचा उपोषणाचा निर्धार, यात अनेकांना राजकीय भविष्य घडविण्याचा संधी दिसू लागली. काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचायची ही संधी ओळखून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपोषण कार्यक्रमाला हातभार लावायला सुरूवात केली आणि संधीचं सोनं करायचा इरादा पक्का केला. रामलीला मैदानावर लोकांची गर्दी पाहून अण्णांचाही उत्साह वाढला. हिंदी चित्रपट अभिनेते अण्णांना भेटून पाठींबा देत होते. प्रसंगी फिल्मी डायलॉग मारून जमलेल्या लोकांमध्ये कमालीचा उत्साह वाढविण्यासाठी हातभार लावत होते. भेटायला आलेल्या व्हीआयपीना अल्पोहार किंवा ज्यूस देण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जात होता. या पवित्र उपक्रमासाठी कोणी ‘अर्थ’पूर्ण काम केले ते गुलदस्त्यात असले तरी लोकांना त्याचा त्याचवेळी सुगावा लागला होता.

आज काय परिस्थिती आहे? गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने लोकपालविषयी एकही अवाक्षर काढलं नाही. अण्णांनी उपोषणाचं बिगुल वाजवली आणि सात दिवस उपोषण करून लोकपालाची नियुक्ती सरकारकडून लिहून घेतली. स्वतःच्या अस्तित्त्वाची पेरणी आणि सरकारला झोपेतून हलविण्याची यशस्वी खेळी त्यांनी केली. या सर्व नाटकात लोकपालविषयक सरकारनेही आपला खुंटा मजबूत करून घेतला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भविष्यात लोकपालांची नियुक्ती होणार हा लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. ‘वाकडा तोंडांचा गांधी’ ही उपाधी देणाऱ्या शिवसेनेला अण्णांच्या मागे आम्ही असल्याचे लोकांसमोर दाखवून आमच्या विचारात बदल झाल्याचे दाखवता आले. अण्णांच्या जीवाशी खेळू नका असे सांगून त्यांच्या जीवाच्या रक्षणार्थ सेना ठाम उभी असल्याचे दाखवून दिले. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाचं लग्न आटोपून दुसऱ्या दिवशी राळेगणसिद्धीत हजर झाले. गावातील लोकांनी अण्णासाठी आंदोलन केले. अरविंद केजरीवाल किंवा किरण बेदी यांनी त्यांची साधी चौकशी केली नाही. परंतु महाराष्ट्रातील नेत्यांनी काळजी घेतल्याबद्दल अण्णा हजारे नक्कीच मनातून समाधानी झाले असतील. तस घडलं नसतं तर देशात तोंड दाखविण्यास जागा उरली नसती. सेवाभावी अण्णांची सेवा करून सर्व पक्षांनी कुंभमेळ्यात स्नान करावे त्याप्रमाणे अण्णांच्या अवतीभोवती राहून पुण्य पदरात पाडून घेतलं आणि पापक्षालनाचा, लोकशाहीच्या नावाने चांगभलं करण्याचा कार्यक्रम एकदाचा आटोपला. यादवबाबाही चिंतामुक्त झाले. राळेगणसिद्धी गावकरी त्यांच्या नेहमीच्या कामाला लागले.

छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत पण आमच्या घरात नको, त्याप्रमाणे अण्णा हजारे राहिले पाहिजेत, पण ते आमच्या विरोधात नको अशी लोकांची मानसिकता दिसून आली. अण्णा, तुम्ही पाहिजेत, पण राळेगणसिद्धीत राहा.. अशी मनोमन इच्छा व्यक्त केली असेल. लोकशाहीत या नवा तमाशा सुरू झाला आहे, तोही महाराष्ट्रातून. जे महाराष्ट्रात घडते त्याचे पडसाद इतर राज्यातही घडत असतात.. बघूया भविष्यात काय तो कायापालट होतोय..”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content