HomeArchiveराहुल गांधी जनतेला...

राहुल गांधी जनतेला ‘पप्पू’ समजतात का?

Details
राहुल गांधी जनतेला ‘पप्पू’ समजतात का?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
अभिनेते अभिताभ बच्चन यांची एका जाहिरातीत ‘पप्पू पास हो गया’ असा संवाद होता आणि तेव्हापासून ‘पप्पू’ हा शब्द विनोदाचा भाग झाला. २०१४ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवले जात होते. कारणही तसे होते कोणताही प्रशासकीय अनुभव नाही, काँग्रेसचे सरकार केंद्रात असूनही मंत्रिमंडळात मंत्रीपद स्वीकारले नाही. फक्त गांधी घराण्यातील म्हणून त्यांना मानसन्मान मिळत होता. पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर होते. श्रीमंत घराणे म्हणून त्यांचा नावलौकिक होता. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन जनतेचे ते नेते झाले. महात्मा गांधी यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन तुरूंगवास भोगला. तुरूंगात असताना अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. ते राजकारणात नसते तर उत्तम लेखक म्हणून नावारूपाला आले असते.

राहुल गांधी हे सत्तेच्या जवळ असूनही त्यांनी ऐन तारूण्यातही लोकचळवळीत भाग घेतला नाही. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरण हाताळायचे सोडून राहुल गांधी रस्त्यावर उतरलेच नाहीत आणि लोकांच्या उग्र आंदोलनाला सामोरेही गेले नाहीत. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी मिळविलेल्या संपत्तीवर ते लोळत आहेत. भारतात वास्तव्य कमी, पण परदेशात त्यांची भ्रमंती वारंवार असायची. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राहुलजींमध्ये हत्तीचे बळ आले आणि राजकारणात ते सक्रिय झालेत. बिहारच्या विधासभा निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली प्रचार सुरू झाला आणि बिहारमधून काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र गांधी घराण्याचा राजपुत्र असल्याने त्यांचा कोणी त्यावेळी राजीनामा मागितला नाही. इतर कोणी त्यांच्या जागी असता तर त्याच्यावर कारवाई करण्यात आली असती. गुजरात निवडणुकीत भाजपाला टक्कर दिल्यानंतर राहुल गांधींचा टीआरपी वाढला. काँग्रेस पक्षात त्यांना अध्यक्ष करण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली आणि पप्पूचं नामकरण राजपुत्रात झाले.

राहुल गांधी सध्या लोकसभा निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. राजकीय पक्षांना लोकांना आश्वासनापेक्षा आमिष दाखवणे आवडते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. तेच शिंदे नंतर बिनदिक्कत पत्रकारांना सांगू लागले, निवडणूक प्रचारात सत्तेत येण्यासाठी बोलावे लागते. त्याचप्रमाणे राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर देशातील गरिबांच्या बँक खात्यात वर्षाला ७२ हजार जमा होतील असे आश्वासन दिले आहे. म्हणजे देशातील २० टक्के गरीब लोकांना याचा लाभ होईल. त्यांच्या आजीनेही म्हणजे इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाव’ घोषणा करून दिल्लीत सत्ता मिळवली होती. मात्र गरीबी काही कमी झाली नाही. सत्ता मिळविण्यासाठी लोकांचा पप्पू करणे हे राजकीय नेत्यांना चांगलं जमतं. हे इतकं ढळढळीत सत्य असताना राहुल गांधी कोणत्या आधारावर गरिबांच्या खात्यात दरमहिना १२ हजार रूपये देण्याचे आश्वासन देत आहेत? लोकांना विश्वासात घेण्यासाठी त्यांनी अंबानी, अदानी आणि निरव मोदी यासारख्या उद्योगपतींच्या खिशात हात घालू असे ते सांगत आहेत. म्हणजे कोणाला तरी धमकावूनच ते गरिबांच्या बँकेत ७२ हजार रक्कम भरणार आहेत. हे काम रॉबिनहूडसारखे आहे. श्रीमंतांना लुटायचे आणि गरिबांना वाटायचे आणि स्वतः लोकनायक असल्याच्या भूमिकेत राहयचे.

तसे पाहिले तर राहुल गांधी आणि डॉन अरूण गवळी यांच्यात काय फरक आहे. राजकीय नेत्यांकडे कोट्यवधी संपत्ती आहे. त्यांच्या खिशात हात घालून गरिबांकडे वळविले तर राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतले असते. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे लग्नापूर्वी फक्त ५० हजार रक्कम होती, ती आता ५० हजार कोटींच्या आसपास आहे. राहुल गांधीं रॉबर्ट वाड्रा यांच्या खिशात हात घालण्याबाबत का बोलत नाहीत? टू-जी, फोर-जी, कोळसा खाण लिलाव भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच्या खिशात हात घालण्याचे धाडस करत नाहीत. भारत महासत्तेकडे जात आहे. अशावेळी गरिबांचे कल्याण करण्यासाठी एखादा उपक्रम राबविण्याएवजी असे पोरकट विधान करून ते स्वतःची प्रतिमा मलीन करत आहेत. भारत सर्व क्षेत्रात भरारी घेत आहे. आजचा तरूण सुशिक्षत आहे. सर्व क्षेत्रात भरारी मारत आहे. शिवाय सन २०२० मध्ये जगात भारत सर्वात जास्त संख्या असलेला तरूण देश असणार आहे. या भावी पिढीबद्दल एकही अवाक्षर न काढता गरीब जनता हमखास वोटबँक असल्याने गरीबी हटाव हा पूर्वीचाच संदर्भ घेऊन जुन्या बाटलीत नवीन दारू भरण्याचे काम राहुल गांधी करत आहेत.

सत्तेत येण्यासाठी निवडणुकीत भरघोस आणि वाटेल ती आश्वासने गरीब व शेतकऱ्यांना दिली जातात. कारण तेच त्यांचे खरे मतदार आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करेल असे राहुल गांधी सांगत आहेत. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला हे का सुचले नाही? शेतकरी, गरीब आणि झोपडपट्टीतील रहिवासी यांना काँग्रेस नेहमी हक्काचे मतदार म्हणून डोळ्यासमोर ठेवून आश्वासनाची आरती ओवाळत असते. नुकतेच राहुल गांधींनी मुंबईत जुन्या चाळीत राहणाऱ्या राहिवाशांना ५०० स्क्वे. फूट जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. हे राहिवाशांना दाखवलेले लॉलीपॉप आहे. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी धारावीतील झोपडपट्टीच्या विकासासाठी १०० कोटी दिले होते. ती विकासकामे आजतागायत पूर्ण झाली नाहीत.

आम्ही मोठ्यांचा सन्मान ठेवतो, असे ते सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा तिरस्कार करीत असले तर त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरभाव आहे, असे सांगत त्यांनी I love you, Modiji,.. असे टाळ्या घेणारे विधान केले. परंतु डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी लोकसभेत संमत केलेले विधेयक राहुल गांधी यांनी पत्रकारांसमोर फाडले. त्या विधेयकाचे तुकडे केले. विशेष म्हणजे त्यावेळी डॉ. सिंह अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांची देशात आणि जगातही इभ्रत गेली. त्यामुळे मोठयांचा आदर करतो हे त्यांचे म्हणणे धादांत खोटे आहे. आपण निवडणूक प्रचारात काय बोलतोय याच भान नसल्याने राहुल गांधी लोकांना पप्पू समजत असावेत.”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content