HomeArchiveशहीद करकरेंची साध्वीकडून...

शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

Details
शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! हे काय घडले? देशासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांची तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने पुन्हा `हत्त्या’ केली. 26/11 चे संकट कोण विसरेल? अतिरेकी कसाब आणि त्याच्या नराधम साथीदारांनी त्यादिवशी मुंबईवर हल्ला चढविला. निष्पाप, निरागस आणि असहाय्य लोकांची त्यांनी क्रूरपणे हत्त्या केली. समुद्र मार्गाने येऊन त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला चढविला. अतिरेक्यांनी क्रूरकृत्याचा कळस गाठला. त्यांना पकडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावलेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे हे देशासाठी शहीद झाले. अवघा देश त्यांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला. पण अतिरेकी म्हणून जिच्यावर खटला सुरू आहे, ती प्रज्ञा सिंह ठाकूर मात्र त्यांचे हे बलिदान विसरली. आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळविणारी प्रज्ञा आपला थयथयाट व्यक्त करताना म्हणाली की, `करकरे माझ्या शापाने मेले. एका साध्वीचा शाप त्यांना भोवला. त्यांनी मला अटक केल्यानंतर मी त्यांना शाप दिला होता. त्यानंतर ते सुतकात होते. माझ्या शापानंतर अवघ्या सव्वा महिन्यात करकरे गेले. तेव्हा त्यांच्यावरील सुतक संपुष्टात आले.’

वास्तविक प्रज्ञा ही संशयित अतिरेकी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक झाली होती. एटीएसचे त्यावेळचे प्रमुख हेमंत करकरे या बॉम्बस्फोटाची चौकशी करीत होते. ते आपले कर्तव्य पार पाडत होते. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञाने शाप दिला. ही कसली साध्वी? यासंदर्भात एक किस्सा आठवला. चंद्रशेखर पंतप्रधान असताना गिरगाव चौपाटीवर जैन संतांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी एका जैन साध्वीने आपल्या जहाल भाषणात राजकीय पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. लोकांनी टाळ्यांचा गजर करीत तिला दाद दिली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणातून तिला जे उत्तर दिले ते अप्रतिम होते. त्या जनसागराने चंद्रशेखर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरश: उचलून घेतले. चंद्रशेखर म्हणाले, `आम्ही राजकारणी वाईट आहोत, हे मला मान्य आहे. पण आमच्यावर टीका करून तुम्ही का वाईट होता? आमचे वाईटपण आमच्याकडेच राहू द्या. शेवटी टीका आणि निंदादेखील हिंसाचार असतो. तो हिंसाचार साध्वीने आणि संतांनी करू नये.’ मोजक्या शब्दात चंद्रशेखर यांनी त्या वाचाळ साध्वीला तिची जागा दाखविली. आज प्रज्ञा ठाकूरदेखील अशीच शाब्दिक हिंसा करीत आहे. तिला तिची जागा कोण दाखविणार?

बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात प्रज्ञा गुंतलेली आहे. पण तरीही भाजपने तिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे शक्तीशाली नेते आहेत. पण त्यांना रोखण्यासाठी संशयित अतिरेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कितपत योग्य आहे? आता प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयिक्तक मत असल्याचा खुलासा भाजपकडून केला जाईल. करकरे यांच्याविषयी पक्षाला आदर असल्याचेदेखील सांगितले जाईल. पण असा आदर केवळ कागदोपत्री दिसता कामा नये. तो कृतीतून दिसायला हवा. भाजपने प्रज्ञा ठाकूर हिची उमेदवारी ताबडतोब रद्द करून तिचे विमान जमिनीवर आणायला हवे. तसे न केल्यास भाजपलादेखील आगामी निवडणुकीत भारी किंमत मोजावी लागेल. शहीदांचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content