HomeArchiveलेकी.. सुना.. मुलांचा...

लेकी.. सुना.. मुलांचा टप्पा!

Details
लेकी.. सुना.. मुलांचा टप्पा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
सतराव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी सुरू असणाऱ्या लोकशाहीच्या महासंग्रामातील महाराष्ट्राचा निवडणुकीचा भाग आता संपत आला आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान आपल्याकडे 14 मतदारसंघांमध्ये पार पडले आहे आणि आता चौथ्या व शेवटच्या टप्प्याची हाणामारी सुरू होत आहे. हाणामारी हा शब्दप्रयोग वाच्चार्थाने आहे शब्दार्थाने नाही! सुदैवाने महाराष्ट्रातील आजवरच्या तीनही टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेच पर पडली आहे. अगदी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया यासारख्या नक्षल प्रभावाखालील भागातही मतदान जोरदार उत्साहात व अत्यंत शांततेत पार पडले आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पुढच्या सोमवारी मुंबईसह खानदेशातली मतदानाची प्रक्रिया पार पडेल व महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांमधील मतदान समाप्त होईल. नंतर महिन्याभराची आपली प्रतीक्षा सुरू होईल ती निकालाची.

23 एप्रिल रोजी जो तिसरा मतदानाचा टप्पा पार पडला. त्यात असणारे मतदारसंघ हे अतिशय चुरशीचे व राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या पुढच्या दहा वर्षांतील राजकीय अंकगणित निश्चित करणारे असे होते यात शंका नाही. तिथे शरद पवार, अजितदादा पवार, नारायण राणे, मुंडे बंधु भगिनी, विखे पाटील, एकनाथ खडसे अशा सर्वपक्षीय दिग्गजांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. ह्या महत्त्वाच्या टप्प्यात राज्यात 14 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली. पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी 31 उमेदवार असून सर्वात कमी 09 उमेदवार सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर व हातकणंगले अशा 14 मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली आहे.

हा महाराष्ट्राच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मोठ्या संख्येने उमेदवार, राजकीय पक्ष आणि मतदार तसेच निवडणूक यंत्रणा या टप्प्यात गुंतलेली होती. भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले अशा मोठ्या क्षेत्रात हा टप्पा विखुरलेला होता. याच तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक दिग्गज मैदानात आहेत. त्यात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. बारामती आणि माढा या मतदारसंघाकडे सध्या राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या दोन्ही मतदारसंघांचे माजी खासदार राहिले आहेत शरदराव पवार आणि या दोन्ही ठिकाणी भाजपाने असे उमेमदवार दिले आहेत की जे शरद पवारांच्या निकटवर्ती वर्तुळातील होते. 2009 मध्ये स्वतः शरदरावांनी बारामतीऐवजी माढा मतदारसंघांमधून निवडणूक लढवली आणि बारामतीची खासदारकी त्यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना बहाल केली. या दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने दणदणीत विजय त्यावेळी मिळवला.

पण 2014 मध्ये हे चित्र बदलू लागले. चिंता वाढू लागली. देशात मोदी लाट होतीच. त्यावेळी स्वतः पवारसाहेबांनी आपण यापुढे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. अकलूज विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे मोहिते पाटलांची तशी पंचाईतच झाली होती. त्यांना पवारसाहेबांनी लोकसभेची संधी दिली. विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांऐवजी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढले. बारामतीत मात्र सुप्रियाताईच उमेदवार राहिल्या. पण दोन्हीकडे अखेरच्या क्षणापर्यंत विजयाची धाकधूक कायम राहिली. बारामतीमध्ये तर भाजपाचे मित्रपक्ष म्हणून लढणाऱ्या महादेव जानकरांनी पवार कुटुंबियांना घाम फोडला होता. बारामती लोकसभा क्षेत्रातील तीन विधानसभांमध्ये सुप्रियाताई मागे पडल्या होत्या. केवळ ६९ हजारांनी निवडणूक जिंकल्या. हे मताधिक्य कमी वाटते. कारण याचठिकाणी पवारांचे मताधिक्य तीन लाखांच्या खाली नसायचे. सुप्रियाताईदेखील २००९ मध्ये मजबूत मताधिक्याने जिंकल्या होत्या. पण २०१४ मध्ये देशात व महाराष्ट्रातही मोदींच्या बाजूने मतांची त्सुनामी उठली होती! इतिहासात कधीच नाही इतका दारूण पराभव काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आला होता. तब्बल 42 ठिकाणी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे उमेदवार जिंकले होते आणि फक्त सहा जागा दोन्ही काँग्रेस पक्षांना मिळून लाभल्या होत्या. बारामती, सातारा, कोल्हापूर आणि माढा या चारच जागी राष्ट्रवादीचा झेंडा लागला होता तर नांदेड आणि हिंगोली या दोनच ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकला होता. त्यातही हिंगोलीतून राजीव सातव यांचा विजय निसटता होता. फक्त सोळाशे मतांनी ते विजयी झाले होते. तसाच निसटता पराभव राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना पाहवा लागला होता. तेही असेच सोळाशे- सतराशे मतांनी पडले होते. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी हे भाजपाचे मित्रपक्ष म्हणून जिंकले होते.

2014 च्या त्या दारूण पराभवानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांचे मनोधैर्य कोलमडून पडणे सहाजिकच होते. पण गेल्या वर्षभरात देशातील वातावरणात बदल घडत गेला आणि त्यातून काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील वारूही फुरफुरायला लागले. विरोधकांच्या ऐक्याची हाक देशात घुमली. त्याला शरद पवारांनीही फुंकर मारली आणि महाराष्ट्रात दोन्ही काँग्रसेचे घट्ट ऐक्य पवारांनीच घडवून आणले. पण त्यांनी माढामधून मोहिते पाटलांना तिकीट द्यायचे की नाही यावर घोळ घातला. स्वतः शरदरावच तिथून लाढतील असे राष्ट्रवादीने जाहीर केले. नंतर पार्थचे कारण देत पवार निवडणुकीतून बाजूला झाले. पण विजयसिहांचे चिरंजीव राणजीतसिंह यांना तिथून उमेदवारी देण्यास पवार तयार नव्हते. रणजीतसिंह भाजपात दाखल झाले आणि विजयसिंहही त्याच वाटेवर आहेत. शरद पवारांमुळेच नगरमध्येही काँग्रेसचा एक मोहरा भाजपाच्या गळाला लागला. नगरची जागा विधानसभेतील विरोधी पक्षनेता राधाकृष्ण यांचे चिरंजीव सुजय यांच्यासाठी सोडावी असा काँग्रेसचा आग्रह पवारांनी धुडकावून लावला. सुजय विखे भाजपात दाखल झाले. राधाकृष्ण विखे जरी सध्या काँग्रेसमध्ये राहिलेले असले तरी ते मनाने कधीच भाजपात पोहोचले आहेत.

हे दोन मोहरे भाजपाला मिळाले कारण शरद पवारच! भाजपाचा फायदा राष्ट्रवादी करून देते तो असा! पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणेच या तिसऱ्या टप्प्यातल्याही लढती त्यासाठीच महत्त्वाच्या ठरल्या. सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे, सेनेचे जुनेजाणते नेते चंद्रकांत खैरे, भाजपचे प्रांताध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे, भाजपाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश बापट, राधाकृष्ण विखेंचे चिरंजीव सुजय विखे पाटील, स्वाभिमानी पक्षाचे नेते व सध्या भाजपाऐवजी विरोधी ऐक्याचे उमेदवार असणारे राजू शेट्टी आणि सर्वात महत्त्वाचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील तेरावे वंशज उदयनराजे असे उमेदवार या तिसऱ्या टप्प्यात आपापले नशीब आजमावत आहेत. महिला उमेदवारांची संख्या या तिसऱ्या टप्प्यातही तशी कमीच आढळली. 249 उमेदवारांमध्ये फक्त 19 महिला उमेदवार होत्या. यापैकी बारामती मतदारसंघ हा ऑल वुमेन लीग म्हणावा असा राहिला आहे! तिथे चार महिला उमेदवारांपैकी दोन प्रमुख स्पर्धक राष्ट्रवादी व भाजपाचे उमेदवार महिला आहेत. सुप्रियाताईंना टक्कर देण्यासाठी भाजपाने जुन्या पवार समर्थक घराण्यातीलच सुभाष कुल यांच्या सुनबाई व आमदार राहूल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांना उमेदवारी देऊन एक बाजी जिंकली होती. आता मतदारांनी त्यांची मते पेटीबंद, नव्हे मतदान यंत्रबद्ध केलेली आहेत. ती काय आहेत 23 मे रोजीच कळणार आहे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content