HomeArchiveशरद पवार आणि...

शरद पवार आणि अर्धी चड्डी!

Details
शरद पवार आणि अर्धी चड्डी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करून शरद पवारांना धक्का दिला. त्यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व मनसुबे धुळीस मिळविले. आपल्या शब्दापलीकडे कोणीही जाऊ शकत नाही, या घमेंडीत असलेल्या पवारांना आयुष्यात हा मोठा झटका मिळाला आहे. छगन भुजबळांना शिवसेनेतून आणताना मोठा पराक्रम केल्याच्या अविर्भावात ते त्यावेळी वावरत होते. दुसऱ्या पक्षातील ‘मिळकत’ स्वतःच्या पक्षात आणून पक्षाची श्रीमंती वाढल्याचा आभास निर्माण होतो, पण पक्ष त्या क्षणापुरता सुजलेला असतो ही वस्तुस्थिती पवारांना माहीत असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आज नियती त्याचा सूड घेताना दिसत आहे.

खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी वयाची ७५ वर्षे आणि सामाजिक कार्यात ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अकलूज येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायापुढे सत्कार केला. कदाचित शरदरावांना हा प्रकार खटकला असेल. खरं पाहता राष्ट्रवादीने वर्षापूर्वीच विजयसिंह यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाची तयारी करायला पाहिजे होती. पण आपल्यापेक्षा मोठा कोणीही होता कामा नये, ही मानसिकता शरदरावांनी कायम ठेवल्याने ही सुवर्णसंधी त्यांना कायमची गमवावी लागली. पवारांनी ६१ वी मोठ्या दणक्यात महालक्ष्मीच्या भव्य मैदानात केली. मात्र त्यांचा अमृतमहोत्सव पाहिजे तसा साजरा करता आला नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात भर पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना ७५ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी राज्यात भाजपाचे सरकार होते. राष्ट्रवादीचे नेते हेमराज शाह यांच्यावर पक्षाने वह्या छापण्याची जबाबदारी टाकली. दुर्दैव असे की, हेमराज शाह यांनी अनेक माजी मंत्री व आमदार यांच्याकडे वह्यांसाठी रक्कम मागितली, पण जाणता राजासाठी कोणीही पैसा देत नव्हता. शेवटी राष्ट्रवादीला कंटाळून हेमराज शाह शिवसेनेत गेले. सत्ता असेल तरच पुढारीपणाची आब असते. नंतर पक्षाच्या अध्यक्षाला कसे वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या जातात हे शरद पवारांना कळू नये?

तर खरा मुद्दा हा की, विजयसिंह आज राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पवारांनी स्वाभिमानाने त्यांना पक्षातून काढायला पाहिजे. पण तसे करण्याचे त्यांनी धाडस केले नाही आणि करणार नाहीत. तसं करता येत नाही म्हणून शरद पवारांनी विजयसिंह यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अर्धी चड्डी घालून भाजपाच्या नेत्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचे चित्र पाहण्याची वेळ माझ्यावर येऊ नये असे सांगितले. त्यांचे हे विधान म्हणजे त्यांच्या संयमशीलतेचा कडेलोट झाल्याचे लक्षात येते.

शरद पवारांनी सन १९७८ मध्ये काँग्रेसला धोका देऊन पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यावेळी जनसंघालाही सरकारात सामील करून घेतले. जनसंघाचे उत्तमराव पाटील हे तर महसूल मंत्री, हशू अडवाणी नगरविकास मंत्री तर प्रमिला टोपले ह्या आरोग्यमंत्री होत्या. त्यावेळी गांधीवादी विचारांच्या पवारांना आपल्याला अर्ध्या चड्डीवाल्यांसोबत बसण्याची नामुष्की येणार आहे, हा विचार मनात आला नाही. केंद्रात दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना ते राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे वाजपेयींनी त्यांना मंत्री दर्जा दिला होता. त्यामुळे लोकसभेत मागच्या आसनावर बसलेले शरद पवार यांना वाजपेयींनी पुढे बसण्याची संधी देऊन त्यांचा सन्मान केला. आता विजयसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार हे काही लपून राहिले नाही. परंतु आपल्यापुढे कोणीही जाऊ नये आणि गेला तर त्याला बेइज्जत करणे एवढेच त्यांच्या हातात उरले आहे.

आपण करतो ते बरोबर आणि पक्षातील अन्य कोणी केले तर टीकास्त्र सोडायचे. आज पवारांच्या राष्ट्रवादीचे जहाज कसेबसे तरले आहे. लोकसभा निवडणुकीचे २३ मेनंतर निकाल लागल्यावर त्यांच्या जहाजातून किती निष्ठावंत उंदरांसारखे उड्या मारतात हे पवारांना पाहवे लागेल. जीवनात पडता काळ येतो, परंतु शरद पवारांसारख्या जाणता राजाच्या हातून असे घडेल असे वाटत नव्हते. वयोमानानुसार त्यांनी छगन भुजबळ किंवा अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी सोपवली असती आणि स्वतः मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली असती तर राष्ट्रावादीची शान राहिली असती. भाकरी वेळीच परतवली नाही तर ती करपते.. राष्ट्रवादीची ही अवस्था का झाली, हे जाणता राजाला सांगणे म्हणजे धाडसाचेच होईल.”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content