HomeArchiveपवारांचे संस्कार..

पवारांचे संस्कार..

Details
पवारांचे संस्कार..

    03-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
हेमंत जोशी..
चांगले संस्कार झालेले फक्त भारतीय जनता पक्षातच आहेत, असे काहीही नसते. पण, उच्च संस्कार लाभलेले झालेले नेते भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत, असे फारतर म्हणता येईल. दिवंगत सुसंस्कारी आर. आर. पाटील तर शरद पवारांचे उजवे हात होते. तरीही किंवा शिवसेनेचे सुधीर जोशी त्यांच्या संस्कारांचा तर एखादा पाठ, धडा शाळेत नक्की शिकविला जावा. विषय आठवला तो गाडगीळ दाम्पत्यावरून. मेधा गाडगीळ प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ आहेत. आता त्या निवृत्तीच्या अगदी उंबरठ्यावर आहेत. त्यांचे पती आमदार आहेत. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे सुपुत्र आहेत. या दोघांनी आडमार्गाने कमवायचे ठरविले असते तर त्यांची गणना आज अगदी शंभर टक्के पुण्यातल्या श्रीमंतामध्ये झाली असती. अलीकडे त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्ताने झालेल्या साध्या स्वागत समारंभाला गेलो होतो. बघून एवढेच लक्षात आले की अनंत गाडगीळ काँग्रेसचे असूनही आणि मेधाताई प्रशासकीय सेवेत असूनही उत्तम संस्कारांच्या बाबतीत करोडपती आहेत. पैसे त्यांनी जे मिळविले ते शंभर टक्के शुद्ध सोन्यासारखे उत्तमरीत्या कमावले. जे राजकारणात आणि प्रशासकीय सेवेत सहसा घडत नाही. संस्कार व शरद पवार हा विषय पुढे असल्याने गाडगीळ दाम्पत्याचा उल्लेख केला..
जे शरद पवार अगदी अलीकडे नरेंद्र मोदींवर टीका करताना जाहीर म्हणाले होते, सत्तेचा उपयोग एखाद्या धर्माच्या प्रसारासाठी करणारा असा पंतप्रधान भारताने याआधी कधी पहिला नाही. हे पंतप्रधान सर्व सहिष्णू तत्त्वांना तिलांजली देत असताना भगवी वस्त्रे घालून, गुहेत जाऊन, तुम्ही देशाला कोणता संदेश देताय, देव, ब्राम्हणांविषयी, भगव्याविषयी, संघ भाजपाविषयी मनात कायम द्वेष ठेऊन त्यापद्धतीने ज्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संदेश पोहोचविले, मनात विष पेरले, बघा नियतीचा खेळ. पुन्हा एकदा येनकेनप्रकारेण जनतेची, फक्त निवडणूक तोंडावर असल्याने सहानुभूती मिळविण्यासाठी हेच शरद पवार जाहीर भगवा झेंडा हाती घेऊन, रथावर चढून मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. अत्यंत लाजिरवाणे म्हणजे ज्यांनी ताठ मानेने लोकांपुढे जाऊन मते मागवीत, असे नेतेही त्यांच्याकडे नाहीत, नव्हते आणि नसतीलही. त्यामुळे बाहेरच्या एकमेव अमोल कोल्हेंना पुढे केले जाते आहे..
देशभक्ती वगैरे असे काहीही पवारांच्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणाचा फक्त स्वतःच्या भल्यासाठी दुरूपयोग करणाऱ्या त्यांच्या चेल्यांच्या मनात नसते. दरोडे कसे टाकावेत, दगाफटका कसा करावा? देश, राज्य कसे लुटावे, लाटावे, ओरबाडावे, तेवढेच त्यांच्या मनात असते. तेच त्यांच्या शिष्यांनादेखील शिकविले गेलेले असल्याने पवारांनी निर्माण केले ते प्रफुल्ल पटेल यांच्याचसारखे देशविके नेते. त्यापलीकडे आणखी असे म्हणता येईल की, चांगले संस्कार झालेले नेते त्यांनी न घडविल्याने कालपरवा शिवसेनेतून आलेले कडव्या भगव्या विचारांच्या कोल्हे यांना वापरले जात आहे. एखाद्याचा वापर करणे हे शरद पवार यांच्या अंगवळणी पडलेले मी स्वतः अनुभवले आहे. मात्र, यापुढे पवारांचे सत्तेत येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने खासदार अमोल कोल्हे मोडित निघणार नाहीत. अन्यथा भुजबळांचे पवारांनी सत्ते असताना जे केले होते. तेच कोल्हे यांच्याबाबतीतही नक्कीच घडले असते.
 

 
 
 
आज जे अमोल कोल्हे करताहेत तेच कधीकाळी समता परिषद स्थापन केलेल्या छगन भुजबळ यांचे झालेले होते. समता परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सभांना जेव्हा राज्यात व राष्ट्रांतही प्रचंड गर्दी व्हायला लागली त्यानंतर काहीच दिवसांत भुजबळ यांचे राजकीय आयुष्य असे काही बेचव केले जाऊ लागले की विचारू नका. राजू श्रीवास्तवच्या विनोदी भाषेत सांगायचे झाल्यास आता शरद पवारांचा म्हातारा गब्बर झाल्याने अगदी शंभर टक्के खासदार अमोल कोल्हे यांचा शोलेमधला विजू खोटे होणार नाही. त्यांचा क्षणार्धात यापुढे राजकीय खात्मा होणार नाही. पवार करूच शकणार नाही. मित्रहो, राज्य कसे लुटले जाते हे आमच्यासारख्या शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अगदी जवळून बघायला मिळत असते. तसे पुरावेही आमच्याकडे असतात. शरद पवार व त्यांच्या विचारांचे नेते, मंत्री, अधिकारी झालेल्यांच्या हाती हे राज्य आले आणि आपली मराठीची येथील जनतेची, सामान्य लोकांची अक्षरश: विकासाच्या नावाने वाट लावली, एवढे खात्रीपूर्वक सांगतो. आर्थिकदृष्ट्या मोठे झालेत ते दलाल, मूठभर नेते आणि अधिकारी.. तूर्त एवढेच!”

 
 
हेमंत जोशी..

“चांगले संस्कार झालेले फक्त भारतीय जनता पक्षातच आहेत, असे काहीही नसते. पण, उच्च संस्कार लाभलेले झालेले नेते भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत, असे फारतर म्हणता येईल. दिवंगत सुसंस्कारी आर. आर. पाटील तर शरद पवारांचे उजवे हात होते. तरीही किंवा शिवसेनेचे सुधीर जोशी त्यांच्या संस्कारांचा तर एखादा पाठ, धडा शाळेत नक्की शिकविला जावा. विषय आठवला तो गाडगीळ दाम्पत्यावरून. मेधा गाडगीळ प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ आहेत. आता त्या निवृत्तीच्या अगदी उंबरठ्यावर आहेत. त्यांचे पती आमदार आहेत. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे सुपुत्र आहेत. या दोघांनी आडमार्गाने कमवायचे ठरविले असते तर त्यांची गणना आज अगदी शंभर टक्के पुण्यातल्या श्रीमंतामध्ये झाली असती. अलीकडे त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्ताने झालेल्या साध्या स्वागत समारंभाला गेलो होतो. बघून एवढेच लक्षात आले की अनंत गाडगीळ काँग्रेसचे असूनही आणि मेधाताई प्रशासकीय सेवेत असूनही उत्तम संस्कारांच्या बाबतीत करोडपती आहेत. पैसे त्यांनी जे मिळविले ते शंभर टक्के शुद्ध सोन्यासारखे उत्तमरीत्या कमावले. जे राजकारणात आणि प्रशासकीय सेवेत सहसा घडत नाही. संस्कार व शरद पवार हा विषय पुढे असल्याने गाडगीळ दाम्पत्याचा उल्लेख केला..”

“जे शरद पवार अगदी अलीकडे नरेंद्र मोदींवर टीका करताना जाहीर म्हणाले होते, सत्तेचा उपयोग एखाद्या धर्माच्या प्रसारासाठी करणारा असा पंतप्रधान भारताने याआधी कधी पहिला नाही. हे पंतप्रधान सर्व सहिष्णू तत्त्वांना तिलांजली देत असताना भगवी वस्त्रे घालून, गुहेत जाऊन, तुम्ही देशाला कोणता संदेश देताय, देव, ब्राम्हणांविषयी, भगव्याविषयी, संघ भाजपाविषयी मनात कायम द्वेष ठेऊन त्यापद्धतीने ज्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संदेश पोहोचविले, मनात विष पेरले, बघा नियतीचा खेळ. पुन्हा एकदा येनकेनप्रकारेण जनतेची, फक्त निवडणूक तोंडावर असल्याने सहानुभूती मिळविण्यासाठी हेच शरद पवार जाहीर भगवा झेंडा हाती घेऊन, रथावर चढून मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. अत्यंत लाजिरवाणे म्हणजे ज्यांनी ताठ मानेने लोकांपुढे जाऊन मते मागवीत, असे नेतेही त्यांच्याकडे नाहीत, नव्हते आणि नसतीलही. त्यामुळे बाहेरच्या एकमेव अमोल कोल्हेंना पुढे केले जाते आहे..”

“देशभक्ती वगैरे असे काहीही पवारांच्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणाचा फक्त स्वतःच्या भल्यासाठी दुरूपयोग करणाऱ्या त्यांच्या चेल्यांच्या मनात नसते. दरोडे कसे टाकावेत, दगाफटका कसा करावा? देश, राज्य कसे लुटावे, लाटावे, ओरबाडावे, तेवढेच त्यांच्या मनात असते. तेच त्यांच्या शिष्यांनादेखील शिकविले गेलेले असल्याने पवारांनी निर्माण केले ते प्रफुल्ल पटेल यांच्याचसारखे देशविके नेते. त्यापलीकडे आणखी असे म्हणता येईल की, चांगले संस्कार झालेले नेते त्यांनी न घडविल्याने कालपरवा शिवसेनेतून आलेले कडव्या भगव्या विचारांच्या कोल्हे यांना वापरले जात आहे. एखाद्याचा वापर करणे हे शरद पवार यांच्या अंगवळणी पडलेले मी स्वतः अनुभवले आहे. मात्र, यापुढे पवारांचे सत्तेत येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने खासदार अमोल कोल्हे मोडित निघणार नाहीत. अन्यथा भुजबळांचे पवारांनी सत्ते असताना जे केले होते. तेच कोल्हे यांच्याबाबतीतही नक्कीच घडले असते.”

 

 
 
 
“आज जे अमोल कोल्हे करताहेत तेच कधीकाळी समता परिषद स्थापन केलेल्या छगन भुजबळ यांचे झालेले होते. समता परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सभांना जेव्हा राज्यात व राष्ट्रांतही प्रचंड गर्दी व्हायला लागली त्यानंतर काहीच दिवसांत भुजबळ यांचे राजकीय आयुष्य असे काही बेचव केले जाऊ लागले की विचारू नका. राजू श्रीवास्तवच्या विनोदी भाषेत सांगायचे झाल्यास आता शरद पवारांचा म्हातारा गब्बर झाल्याने अगदी शंभर टक्के खासदार अमोल कोल्हे यांचा शोलेमधला विजू खोटे होणार नाही. त्यांचा क्षणार्धात यापुढे राजकीय खात्मा होणार नाही. पवार करूच शकणार नाही. मित्रहो, राज्य कसे लुटले जाते हे आमच्यासारख्या शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अगदी जवळून बघायला मिळत असते. तसे पुरावेही आमच्याकडे असतात. शरद पवार व त्यांच्या विचारांचे नेते, मंत्री, अधिकारी झालेल्यांच्या हाती हे राज्य आले आणि आपली मराठीची येथील जनतेची, सामान्य लोकांची अक्षरश: विकासाच्या नावाने वाट लावली, एवढे खात्रीपूर्वक सांगतो. आर्थिकदृष्ट्या मोठे झालेत ते दलाल, मूठभर नेते आणि अधिकारी.. तूर्त एवढेच!”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content