HomeArchiveपुढचे ४८ तास...

पुढचे ४८ तास महत्त्वाचे!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतकेच सांगितले की, “राज्याला सरकार हवे आहे आणि सरकार लवकरात लवकर स्थापन होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.” मात्र या बोलण्यात कुठेही हे सरकार महायुतीचे असेल असे उद्गार त्यांनी काढले नाहीत, ही बाब महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळेच भाजपप्रणित नवे सरकार सध्यातरी, २०१४ प्रमाणे, शिवसेनेला वगळून भाजपासह अन्य मित्रपक्षांचे असण्याची शक्यता दिल्लीतील सूत्रांनी व्यक्त केली आहे.”
 

“दरम्यान, शिवसेनेसोबत स्थापन करायच्या संभाव्य संयुक्त राज्य सरकारसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोनिया गांधींची संमती घेतल्याचेही संकेत दिल्लीतून मिळत आहेत. सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर स्वतः शरदरावांनी असे सांगितले आहे की, अद्याप शिवसेनेकडून सरकार स्थापन करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आमच्यापुढे आलेला नाही. मात्र सोनिया गांधींबरोबर जी चर्चा झाली ती उद्या मुंबईत पक्षातली अन्य सहकाऱ्यांपुढे मांडणार आहे व त्यानंतर पुन्हा दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी येणार आहे असे ते म्हणाले.”
 
 
“दरम्यान, अमित शाह यांनी फडणवीस यांना असे स्पष्ट आदेश दिले आहेत की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद वा गृहमंत्रीपद वगळून काहीही देता येईल. मात्र तो तिढा तुम्ही तुमच्या स्तरावरच सोडवा. काही झाले तरी पुढच्या काही दिवसांतच सरकार स्थापन केले जाणे हेही अपिरहार्य मानले जात आहे. या त्यांच्या उद्गारांवरून पुन्हा एकदा विविध पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शरद पवार घडवतील असे दिसते आहे. या नव्या पुलोदच्या प्रयोगात शिवसेनेची भूमिका मोठी असेल. त्यांच्याकडे सर्वाधिक आमदार असल्यामुळे मुख्यमंत्रीपद सेनेकडे सोपवले जाऊ शकते. मात्र सरकार स्थापनेसाठी अत्यावश्यक असणारा काँग्रेसचा पठिंबा शिवसेनेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्यामुळे त्या सरकारवर सेनेपेक्षा राष्ट्रवादीची छाप व सत्ता अधिक असू शकेल. त्या स्थितीत शिवसेनेकडे क्रमांक एकचे पद मात्र महत्त्वाची खात्यातील व एक वा दोन, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकतील असे अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत.”
 
 
तिकडे दिल्लीत फडणवीस यांनी नितीन गडकरींसह अन्य नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्या आटोपून मुख्यमंत्री रात्री उशिरा मुंबईत परतले. मंगळवारी ते पक्षातील त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. या बैठकीत भाजपाची पुढची रणनीती ठरेल असे सांगण्यात येते. या सर्व घडामोडींवरून पुढचे दोन दिवस म्हणजे कत्तलकी रात व दिन असणार आहेत.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content