HomeArchive30 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचा...

30 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचा दर राष्ट्रीय दरापेक्षा कमी!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
भारतात, दररोज दहा लाख लोकांमागे 180 चाचण्या केल्या जात आहेत, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद दीर्घकाळापर्यंत दररोज 140 चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. तसेच 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 बाधितांचा दर आहे राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे. याव्यतिरिक्त, मृत्यूचे प्रमाण घटून 2.43% पर्यंत खाली आले आहे. बर्यामच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यूदर राष्ट्रीय मृत्यू दरापेक्षा कमी आहे.
 
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी (ओएसडी) राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे आयोजित कोविड-19वरील कारवाई, सज्जता आणि अद्ययावततेबाबत ही माहिती दिली. भूषण म्हणाले की, बाधितांचा दर खाली आणण्यासाठी आक्रमक चाचणी, हे कोविड-19 विरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र आहे. “कोविड-19 सकारात्मकतेचा दर 5% टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी ही चाचणी पातळी कायम ठेवण्याचे उद्दीष्ट आहे,”
 
देशात आजपर्यंतची कोविड-19 बाधित सक्रिय रुग्णांची संख्या 4,02,529 आहे. आपण आता सक्रिय प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जे रूग्ण आहेत ते रुग्णालय, केअर सेंटरमध्ये किंवा घरी विलगीकरणात आहेत. सक्रिय रूग्णांचे प्रमाण सतत कमी होत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातल्या दहा लाख लोकसंख्येमध्ये कोविड-19चे प्रमाण हे जगातील सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशांपैकी एक आहे तर काही देश असे आहेत जिथे ही संख्या भारताच्या तुलनेत 12-13 पट जास्त आहे. या व्यतिरिक्त, भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे कोविड-19 संबंधित मृत्यूदर जगातील सर्वात कमी मृत्यूदरांपैकी एक आहे. काही देशांमध्ये ही संख्या भारताच्या तुलनेत 21-33 पट जास्त आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सहकार्य करत आहे. सर्व निर्णय विज्ञान आणि पुरावा-आधारित माहितीच्या आधारे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले जात आहेत, असेही ते म्हणाले.
 

 
 
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक (एनसीडीसी) डॉ. एस. के. सिंग म्हणाले की, दिल्लीतील सेरो-सर्व्हेमध्ये 22.86% संसर्ग होण्याचे प्रमाण दर्शविले आहे, जे लॉकडाऊन आणि कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांद्वारे केलेल्या प्रयत्नांची परिणामकारकता दर्शवितात. त्याचवेळी उर्वरित 77% असुरक्षित आहेत. म्हणूनच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे स्वाभाविक आहे की लक्षणे नसलेले काही लोक देखरेख यंत्रणेच्या चाचणीतून निसटले असण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत, सेरो सर्वेक्षण समुदायात कोविड-19 संसर्गाच्या व्यापकतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते. आयजीएम अँटीबॉडी सक्रिय कोविड-19 संसर्गाचे अस्तित्त्व दर्शविते. परंतु ते संपूर्ण प्रादुर्भावाचे स्पष्ट चित्र देत नाही. दुसरीकडे, आयजीजी अँटीबॉडी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. अॅंन्टीबॉडी डिटेक्शन चाचण्यांमुळे समाजात होणाऱ्या संसर्गाच्या व्यापकतेचे आकलन होण्यास मदत होते, तर आरटी-पीसीआर चाचण्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट्स प्रत्यक्षात कोविड-19 रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरतात. 27 जून ते 10 जुलै या कालावधीत करण्यात आलेला 20,000हून अधिक सहभागींचा सध्याचा सेरो-सर्वे हा दिल्लीच्या प्रतिबंधित क्षेत्रात आयसीएमआरने केलेल्या सीरो-सर्वेचा पाठपुरावा आहे. दिल्लीतील सेरो-सर्व्हेसाठी 1 वर्षावरील सर्व वयोगटाचे नमुने घेण्यात आले होते.
 
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, एम्स, नवी दिल्ली, आरोग्य मंत्रालय आणि नीती यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19बाबत राष्ट्रीय क्लिनिकल ग्रँड राउंडची सुरूवात करत आहे. त्यामुळे डॉक्टरांद्वारे केलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि पुरावा-आधारित कोविड-19 उपचार समोर आणण्यास मदत करेल. दिल्लीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात सहा महिन्यांनंतरही हा संसर्ग केवळ 23%पर्यंत पोहोचला आहे. हे असे दर्शवते की, सरकार आणि समुदायाद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे या पातळीपर्यंत संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. यामुळे आम्हाला प्रतिबंधात्मक उपायांच्या परिणामकारकतेबाबत आत्मविश्वास मिळाला आहे. तज्ज्ञांशी सल्लामसलत करून वाढवलेल्या चाचण्या आणि प्रतिबंधात्मक धोरणामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील कोविड-19च्या 37% सकारात्मकतेच्या दरापेक्षा नवीन रूग्णांची संख्या आताच्या पातळीवर आली आहे.
लसीच्या चाचण्यांबाबतच्या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोविड-19 लसीच्या चाचण्यांसाठी आवश्यक वैज्ञानिक, नैदानिक नैतिक कठोरपणा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक नियमन सुविधा सुनिश्चित केली जात आहे. परवडणारी कोविड-19 लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.
 
नीती आयोगाच्या आरोग्य सदस्यांनी चाचणीसंदर्भातील माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, काही आठवड्यांत दररोज 5 लाखांहून अधिक कोविड चाचणी क्षमता प्राप्त करू आणि आगामी काळात आपण दररोज दहा लाख चाचण्यांचा टप्पा पार करू.
 “

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content