HomeArchiveमहाराष्ट्रातील दोन शिक्षकांना...

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार!

Details
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर शास्त्रीभवन स्थित शिक्षण मंत्रालयातून केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरीयाल निशंक आणि शिक्षण
 
 
  

 
राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी 47 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणीमध्ये गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
 
अहमदनगर जिल्हयाच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी (चेडगांव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलाराम यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत मंगलाराम हे नवनवीन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी ई-लर्निंग पद्धतीचा अवलंब केला असून शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल केला आहे. मंगलाराम यांनी सुरु केलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरूम’च्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थी हे परदेशातील शिक्षकतज्ज्ञांशी संवाद साधतात. ‘स्काइप इन क्लासरूम’ या उपक्रमाद्वारे या शाळेतील विद्यार्थ्यांनी 25 देशांतील 200 पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक देवाण-घेवाण केली आहे. त्यांनी दक्षिण कोरियामधल्या शाळेबरोबर ‘कल्चरल बॉक्स’ हा सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा उपक्रम राबविला आहे.
 
“विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन तसेच शालेय स्तरावरील ‘बालआनंद मेळावा’, ‘बालसृष्टी उपक्रम’, ‘डॉ अब्दुल कलाम तरंग वाचनालय’ आदी त्यांचे उल्लेखनीय उपक्रम आहेत. स्थानिक ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यांनी जागरूकता घडवली व या कार्यात त्यांचेही सहकार्य मिळविले आहे.”
 
मुंबई येथील अणुशक्तीनगर भागातील भाभा अणुशक्ती केंद्रीय शाळा क्रमांक 4च्या शिक्षिका संगीता सोहनी यांना उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. हसत खेळत विज्ञान शिकवण्याची कला त्यांनी विकसीत केली आहे. आयसीटी शिक्षण पद्धतीचा प्रभावी उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण
  

 

 
अधिक सोपे केले. काचेच्या बांगड्यांद्वारे केमीकल बाँडींग आणि फुग्यांचा उपयोग करून रसायण शास्त्रातील बारीकसारीक घटक शिकवण्याच्या त्यांच्या कलेचे विशेष कौतुक झाले. विद्यार्थ्यांना अध्ययन अधिक सुगम होण्यासाठी त्या आपल्या सहकारी शिक्षक शिक्षिकांनाही प्रशिक्षण देतात.
 
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे अभिनंदन केले आणि शालेय शिक्षण गुणात्मकरित्या सुधारण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपैकी जवळपास 40 टक्के विजेत्या महिला होत्या आणि शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.
  
“डॉ. एस. राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण करत राष्ट्रपती कोविंद म्हणाले की ते एक दूरदर्शी, मुत्सदी आणि सर्वात उल्लेखनीय म्हणजे एक असामान्य शिक्षक होते. डॉ. एस. राधाकृष्णन देशाच्या विकासासाठी केलेल्या सेवांचा आणि देशातील सगळ्या शिक्षकांच्या प्रती आदर दर्शविण्यासाठी राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो असे ते म्हणाले.”
 
“नवीन शिक्षण धोरण आमच्या मुलांना भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम करेल आणि विविध भागधारकांच्या मतांचा विचार केल्या नंतरच या धोरणाची आखणी करण्यात आली आहे असे राष्ट्रपती म्हणाले. हे धोरण आता यशस्वी व फलदायी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांची असेल, असेही ते म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी स्वागतपर भाषण केले तर शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आभार प्रदर्शन केले.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content