HomeArchive५ ऑक्टोबरपासून राज्यात...

५ ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल सुरू

Details
  
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com 
 
“राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन्स) जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरू करता येणार आहेत.
 
यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणे तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
 
अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आली असून ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध राहणार नाहीत. डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील लोकल फेऱ्या वाढवण्याचे तसेच पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार आहेत. मात्र, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क बंद राहणार आहेत.
 
राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढल्यानंतर मध्य रेल्वे कामाला लागली आहे. महाराष्ट्रातील इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती, डेक्कन एक्सप्रेस यांच्यासह, मुंबई-नागपूर, मुंबई-सोलापूर, मुंबई-अमरावती, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-औरंगाबाद, यासह सर्व महत्त्वाच्या एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने थेट पत्र न लिहिता, आदेश जारी केल्याने हे आदेश विनंतीपत्र मानून रेल्वे सुरू करण्यासाठी आवश्यक ते काम करण्यास सुरूवात करण्यात आल्याचे कळते.”

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content