HomeArchiveतिसर्‍या ‘नॅशनल टीचर्स...

तिसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन

Details
तिसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे दि. ४ ते ६ जानेवारी २०१९ या कालावधीत तिसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन कोथरूड, पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. ‘भविष्यदर्शी उच्च शिक्षणाकडे झेपावताना’ हा परिषदेचा मुख्य विषय आहे. या विषयावर बीजभाषण परिषदेचे अध्यक्ष व जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर देणार आहेत.

या तिसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसमध्ये देशविदेशातील सुमारे पन्नास मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. यंदाच्या एनटीसी परिषदेस देशविदेशातील पाच हजार प्राध्यापक येणार आहेत. यावर्षी चेन्नई येथील ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संस्थापक आणि अधिष्ठाता प्रा. बाला बालचंद्रन, एआयसीटीईचे चेअरमन प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे आणि वेल्लूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि कुलपती डॉ. जी. विश्‍वनाथन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), नॅक, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन, यूनेस्को, युनिसेफ, एआयसीटीई, असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र प्राचार्य परिषद या भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख संस्था नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या सहयोगी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे चीफ पॅट्रन असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे पॅट्रन आहेत.
या राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाचे फाऊंडिंग पॅट्रन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, यंदाच्या एनटीसीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अध्यक्षपदी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड हे या परिषदेचे संस्थापक आहेत. नॅशनल टीचर्स काँग्रेसचे जागतिक संयोजक डॉ. जय गोरे आहेत.

या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. ४ जानेवारी २०१९ रोजी तर समारोप रविवार, दि. ६ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. या तीन दिवसीय परिषदेत एकूण सात सत्रे ठेवण्यात आली असून, विषय पुढीलप्रमाणे आहेत. उच्च शिक्षणाची भविष्य काळातील झेपः संधी आणि आव्हाने, वैश्‍विक मूल्याधिष्ठित उच्च शिक्षण, भविष्यकालीन उच्च शिक्षणाची पूर्वतयारी, शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे आणि युनिसेफ, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताकडून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गिणत (स्टेम टू स्टिम), भविष्याकालासाठी योग्य शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा योग्य मार्ग आणि भारतामधील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेची चळवळः वर्तमान आणि भविष्य. याशिवाय विशेष अशा दोन ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले आहे. या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले आहे. त्यामध्ये यूएस मधील सायंटिफिक नेटवर्क फॉर इनोव्हेशन अ‍ॅण्ड रिसर्च एक्सलन्सचे अब्राहम अजित, इलिनॉइस स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रो. अ‍ॅण्ड कोऑर्डीनेटर कम्प्यूटर सिस्टिम्स टेक्नॉलॉजी प्रोग्रामच्या अनु गोखले, आयआयटी रूडकीचे संचालक अजित कुमार चतुर्वेदी, आयआयटी खरगपूरचे संचालक अमिताभ घोष, यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, टेक्सास ए अ‍ॅण्ड एम युनिव्हर्सिटीचे देबीज्योती बॅनर्जी, आयआयटीचे माजी संचालक देवांग कक्कर, केन्याटा युनिव्हर्सिटीच्या आयसीसीडीच्या संचालिका फि लिसिका वंजीरू नजिगुणा, मस्कत येथील बायन कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीजचे प्रमुख फिरोज मोहम्मद, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या सिव्हील अ‍ॅण्ड एनव्हिरॉनमेंटल इंजिनियर गौरव संत, बांग्लादेश येथील ढाका विद्यापीठाच्या मास कम्यूनिकेशन डिपार्टमेंटच्या गतियारा नसरिन, लाल बहाद्दुर शास्त्री विद्यापीठाचे कुलगुरू हरी गौतम, यू एस येथील एमआयटी विद्यापीठाच्या एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड एक्ट्रॉनिटिक्स विभागाचे जयंत सबनीस, बंगलुरू येथील एक्झीमचे निर्माता जे.फिलिप्स, न्युयार्क युनिव्हर्सिटीचे मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड फिजिक्सचे प्रा. किशोर मराठे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी प्राध्यापक मार्क लिंडली, पुर्डी युनिव्हर्सिटीचे कन्स्ट्रकशन विभाग आणि मॅनेजमेंटचे प्रमुख मकरंद हस्तक, वरिष्ठ वैज्ञानिक एम.आर. मोझाफरी, नॉट्रॅड्रॅम युनिव्हर्सिटीचे आयसीईएनएसएचे संचालक एन.सी.चावला, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे फायनान्स केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक नवीन चोप्रा, ग्रेट लेक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष पराग दिवाण, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक पद्मभूषण बाळाराम, इंदिरा गांधी टेक्निकल युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉ. प्रीतम सिंग, आयआयटी खरगपूरचे डायरेक्टर पार्थ प्रतिम चक्रबर्ती, एनएएसीच्या सल्लागार राम. के., कोपेन हेगन बिझनेस स्कूलचे बिझनेस डाटा अ‍ॅनॅलिटिक्स सेंटरचे संचालक रवी वत्रापू ,जयपूर येथील लक्ष्मीपथ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रोशन रैना, एनएएसीचे संचालक एस.सी. शर्मा, रायपूर येथील आयटीएम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू संजय कुमार, यू.के. मधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाचे टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटचे रीडर शंकर शिवराज, थायलंड येथील एनआयडीए बिझनेस स्कूलचे सलील के. सेन, महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंटचे स्कॉट हॅरियट, युनिसेफच्याकम्यूनिकेशन स्पेशालिस्ट स्वाती मोहपात्रा, एआयसीपीचे अध्यक्ष सुभाष ब्रह्मभट्ट, एनएएससीच्या सुजाता शानभाग, बंगलुरू सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू एस. जाफेट, आर्थर लोवेस डिक्कीसन श्रीकांत दातार, फोर्टीस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे कार्यकारी संचालक उपेंद्र कौल, दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू योगेश सिंग आणि एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सुनील राय आदि मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.”
 
“केएचएल ब्युरो

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content