HomeArchiveमुंबईच्या लाईफलाईनमध्ये खुुनी,...

मुंबईच्या लाईफलाईनमध्ये खुुनी, दरोडेखोरांची घुसखोरी!

Details
“मुंबईच्या लाईफलाईनमध्ये खुुनी, दरोडेखोरांची घुसखोरी!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
मुंबई नगरी बडा धोका..! असा कधीच विचारही मनाला शिवला नव्हता. पण, गेल्या काही वर्षांत रोजगार, पर्यटनाच्या निमित्ताने वाढलेले लोंढे पाहता चुकूनमाकून मुंबई पाहायला आलेला गाव-खेड्यातला माणूस लोकलची पायरी चढला तर तो कधीच मुंबईचे नावही काढणार नाही, हा अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळेल. मुंबईचा अंदाज नसलेला, इथला फर्स्ट व सेकंड क्लास माहीत नसलेला प्रवासी चुकून जरी पहिल्या डब्यात शिरला तर टीसी त्याला उभा-आडवा कापून ज्या पद्धतीने त्याचे पाकिट मारतो, हे आपल्यातील अनेकांनी आँखो देखी पाहिलं असेल. आता तर खरेखुरे चोर, दरोडेखोर, खुनी रेल्वे लोकलमध्ये घुसून बिनधास्त लूट माजवू लागले आहेत. खून पाडू लागले आहेत.

सरते वर्ष 2018 चा विचार करता मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमध्ये हत्येचे गुन्हे दुप्पट वाढले आहेत तर सुमारे 37,00 दरोडेखोरीची प्रकरणे घडली आहेत. रेल्वेची सेवा-सुरक्षित सेवा या भरवशावर रात्री-बेरात्री प्रवास करणार्‍या मुंबईकरांचे एक दोन नव्हे तर तब्बल 69 कोटींचे दागिने व मौल्यवान वस्तूंची चोरट्यांनी हातसफाई केली आहे. सरत्या वर्षात वाढलेला मुंबईतील रेल्वे गुन्ह्यांचा हा आलेख पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागापेक्षा तिप्पट आहे. खरंतर रेल्वे पोलीस, केंद्रीय रेल्वे विभाग व केंद्र सरकारची छाती अभिमानाने फुलून जावी, असा हा भीमपराक्रम आहे. एकमेकांच्या जीविताची हानी करण्यापर्यंत गेलेली प्रवाशांतील भांडणे, वैयक्तिक वाद आदी कारणे रेल्वेतील हत्त्येच्या घटना वाढीस लागण्यास कारणीभूत आहेत. मुलुंडमधील एक व्यावसायिक दीपक पटवा यांना धावत्या लोकलमधून फलाटावर फेकल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. याच पटवा यांनी एका महिलेशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याने तिने त्याला फलाटावर ढकलून दिले होते. या महिलेच्या जबानीनंतर कोर्टाने तिला जामीनही मंजूर केला. लोकलने प्रवास करत असताना अशी अनेक प्रकरणे दररोज घडत असतात. त्यामुळे अशी प्रकरणे काही नवी नाहीत.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका समलिंगीने नातेसंबंधात आलेल्या दुराव्यामुळे आपल्या पार्टनरचा गळा कापून त्याचा मृतदेह गोरेगाव ते मालाड स्थानकांदरम्यान रेल्वे रूळावर फेकून दिला होता. भुज-दादर एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या दारिया चौधरी या महिलेचा मृतदेह दादर रेल्वेस्थानकात एक्स्प्रेसमध्ये आढळून आला होता. या घटनेत दारिया यांच्या गळ्यातील दागिने लांबवून दरोडेखोराने त्यांची अंत्यत शांत डोक्याने हत्त्या केली होती. 2017मध्येही रेल्वे प्रवासात अशाप्रकारे चार खुनाच्या घटना घडल्या होत्या. तर 2018मध्ये हत्त्यांच्या घटनांची संख्या आठवर गेली होती. दरोड्याचे गुन्हे 496 वरून 994 पर्यंत गेले होते. ग्रामीणपेक्षा शहरी भागात वाढती गुन्हेगारी पाहता मुंबईची लोकलसेवा आणि रेल्वेसेवा आता किती सुरक्षित आहे आणि प्रवाशांस येत्या काळात ती आणखी किती सुरक्षित राहील, हा विश्वास देण्यासाठी रेल्वे प्रशासन काय करते आहे, यावर प्रकाश पडला पाहिजे.

मुंबई हे देशाचे आर्थिक व व्यापारी केंद्र असल्याने इथे मालमत्ता वादासंबंधी गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. एकट्या महाराष्ट्रात रेल्वेत घडणार्‍या दरोडेखोरीच्या घटनांची संख्या ही गेल्या वर्षी 88 टक्के आहे. यामध्ये चोरीच्या घटनांचे प्रमाण 10 टक्के आहे. राज्यभर नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 48, 000 इतकी आहे. अनेक घटनांमध्ये प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू कपडे, दागिने रेल्वेत विसरून जातात. पण, याचे प्रमाण खूप कमी असून दरोडे व चोरीच्या गुन्ह्यांची संख्या मोठी असल्याचे दस्तुरखुद्द जीआरपीचे पोलीसच सांगत आहेत. सोयीची, सुरक्षेची आणि मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाला जोडणारे जाळे फक्त रेल्वेचे असल्याने ती देशातील सर्वात महत्त्वाचे दळवळणाचे साधन आहे. परंतु, याच रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस धोक्याचा व असुरक्षित होऊ लागल्याने चोर, दरोडेखोरांच्या व खुनी कृत्य करणार्‍यांच्या दहशतीला लगाम कोण घालेल, ही चिंता सामान्य प्रवाशांना आहे. एकट्या मुंबईत साल-दरसाल रेल्वेत घडणार्‍या विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या 2017 पर्यंत तरी 158 इतकी आहे. त्यामुळे हा गुन्ह्यांचा आलेख असाच वाढत गेल्यास आपल्या माता, भगिनी, पत्नी, लेकी-बेटी यांचा रेल्वे प्रवास सुरक्षित आहे, इतके बेफिकिरी आपण मुंबईकर म्हणून आपल्याला बाळगता येईल का? लोकलच्या दरवाजात होणारे अपघात टाळण्यासाठी आता निळे दिवे दरवाजात लावले जाणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. गोयल आपल्या ट्विटमध्ये सेफ्टी फर्स्ट!, असे म्हणतात. त्यांना आमचं एवढचं सांगण आहे की मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सुरक्षेचं जाळ अधिक घट्ट विणून चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठीही आपली आश्वासक पावलं पडावीत, इतकचं.”
 
“विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content