HomeArchive`किर्ती'ची अपकिर्ती!

`किर्ती’ची अपकिर्ती!

Details
`किर्ती’ची अपकिर्ती!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार किर्ती आझाद यांना तीन दिवसांपूर्वी भाजपाने पक्षातून हाकलून दिले. त्यानंतर ते त्वरीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. पण जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जवानांच्या बलिदानामुळे त्यांना तीन दिवस थांबावे लागले. सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत किर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपलं घोडं काँग्रेसच्या गंगेत न्हाऊन घेतलं.

खरे म्हणजे, किर्ती आझाद यांचे वडील भागवत झा आझाद हे कट्टर काँग्रेसवाले. त्यांच्या वशिल्यामुळेच कीर्ती आझाद यांचा भारतीय क्रिकेट संघात प्रवेश झाला. अनेक गुणी क्रिकेटपटू स्पर्धेत असतानाही आझाद यांना भारतीय क्रिकेट संघाची कॅप परिधान करण्याचे भाग्य लाभले. 1983 साली विश्वविजेत्या ठरलेल्या कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघातदेखील ते होते. पण क्रिकेटमध्ये त्यांना फारशी चमक दाखविता आली नाही. वशिल्यामुळे एखाद्या क्षेत्रात संधी मिळू शकते. पण त्या क्षेत्रात चमकण्यासाठी अंगी गुण आणि कर्तबगारी असावी लागते. ती गुणवत्ता आझाद यांच्या ठायी नव्हती हे नंतर सिद्ध झाले. म्हणूनच त्यांची क्रिकेटमधील कारकीर्द ही अल्पायुषी आणि अपयशी ठरली.

पण आझाद यांना नशिबवान म्हणायला हवे. त्यांना क्रिकेट नीट जमत नसले तरी राजकारण चांगले जमले. राजकारणासाठी हवे असलेले र्वक्तृत्व त्यांनी कमावले. यशस्वी राजकारणी होण्यासाठी लागणारा संधीसाधूपणादेखील त्यांनी चांगलाच जोपासला. परिणामी, आपल्या वडिलांना बिहारचे मुख्यमंत्रीपद देणाऱ्या काँग्रेसला रामराम ठोकून ते भाजपमध्ये दाखल झाले. 60 वर्षे वय असलेले किर्ती आझाद तब्बल 26 वर्षे भाजपमध्ये होते. बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून तीनवेळा ते लोकसभेवर निवडून गेले. पण भाजपमध्ये आता आपली डाळ शिजत नसल्याचे पाहून त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला. शिवाय आपली घरवापसी झाली असल्याचेदेखील त्यांनी पत्रकारांना निर्लज्जपणे सांगितले.

आपले वडील भागवत झा आझाद यांना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अवघ्या 26 व्या वर्षी कसे लोकसभेत पाठवून खासदार केले, हेदेखील कीर्ती आझाद सांगून गेले. सारांश, काँग्रेसशी असलेली आपली नाळ त्यांनी काँग्रेसमध्ये येताच दाखवायला सुरूवात केली. गेली 26 वर्षे काँग्रेसवर टीका करणारी त्यांची फटकळ जीभ आता भाजपवर टीका करू लागली. राफेल व्यवहारात घोटाळा झाला असल्याचे भाजपच्या लोकप्रतिनिधींनादेखील वाटते, असे आता किर्ती आझाद सांगत आहेत. एखाद्या अट्टल राजकारण्यासारखे ते वागत आहेत.

कीर्ती यांच्यातील अनेक दुर्गुणांपैकी एक दुर्गुण म्हणजे ते खेळाडू असूनही त्यांच्या ठायी खिलाडूवृत्ती नाही. त्यांना स्वत:ला क्रिकेटमध्ये मोठे यश मिळाले नाही. त्यामुळे घवघवीत यश मिळविणाऱ्या आपल्याहून वयाने लहान असलेल्या क्रिकेटपटूंवर ते सदैव जळफळत राहिले. सचिन तेंडुलकरचे गोडवे संपूर्ण देश गात असताना कीर्ती आझाद मात्र अनेकदा त्याच्यावर टीका करताना दिसले. सचिनचा फॉर्म कमी झाल्यानंतर तर आझाद यांनी अधिक जहरी टीका करण्यास सुरूवात केली. आता तशीच टीका ते भाजपवर करू लागले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे, क्रिकेटसाठी लागणारी गुणवत्ता त्यांच्यात नव्हती. राजकारणात लागणारी पक्षनिष्ठादेखील त्यांच्याकडे कधीही नव्हती. म्हणूनच खासदारकीची संधी मिळताच काँग्रेसकडे पाठ फिरवून त्यांनी भाजपशी घरोबा केला. आता भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळणार नाही असे दिसताच त्यांनी काँग्रेसला कवटाळले. अशाप्रकारे कीर्ती आझाद यांची अपकिर्तीच वेळोवेळी दिसली. राजकारणात जे पदरात पडेल ते पवित्र मानून घ्यायचे असते. काँग्रेसने कीर्ती आझाद यांच्याबाबतीत तेच केले आहे. न जाणो उद्या काँग्रेसच्या तिकिटावर कीर्ती आझाद पुन्हा खासदार होतील. यालाच राजकारण म्हणतात.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content