अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...
मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...