Sunday, April 27, 2025
Homeडेली पल्ससंत भगवानबाबा वसतिगृह...

संत भगवानबाबा वसतिगृह योजनेतील 62 वसतिगृहांना मान्यता

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. 82 पैकी 20 वसतिगृहे सुरु असून उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना घेतला होता. बीड, अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये निधीदेखील शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यात यावेत, याबाबत मंत्री मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यांत 62 वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही वसतिगृहे सुरुवातीस भाड्याच्या जागेत चालवली जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून खुली करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील.

वसतिगृह

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यादृष्टीने ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास व भोजनाची उत्तम सोय व्हावी, या दृष्टीने ही वसतिगृहे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या पुढील पिढ्यांच्या हातात कोयता येऊ नये, यादृष्टीने शासनाचे हे अत्यंत मोठे पाऊल आहे. वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंडे यांनी आभार मानले आहेत.

या ठिकाणी सुरू होणार प्रत्येकी दोन वसतिगृहे:-
बीड जिल्हा- वडवणी, धारूर, शिरूर कासार, आष्टी, अंबाजोगाई
अहमदनगर- शेवगाव
जालना- परतूर, बदनापूर, जालना, मंठानांदेड-कंधार, मुखेड, लोहा
परभणी- गंगाखेड, पालम, सोनपेठ
धाराशिव- कळंब, भूम, परांडा
लातूर- रेणापूर, जळकोट
छत्रपती संभाजीनगर- पैठण, सोयगाव, सिल्लोड
नाशिक- निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर
जळगाव- एरंडोल, यावल, चाळीसगाव

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content