Homeमुंबई स्पेशलगरजू वैद्यकीय विद्यार्थांना...

गरजू वैद्यकीय विद्यार्थांना मिळणार ५ लाखांची मदत

मुंबईतल्या लोकमान्य सर्वसाधारण रुग्णालय तसेच रोटरी क्लब ऑफ सायनच्या माध्यमातून येत्या २७ जूनला गरजू व मागास प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना ५ लाख रूपयांची मदत करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका शिक्षकाच्या मुलीकडून ही मदत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ही मदत योग्य वेळेत मिळावी यासाठी समाजविकास अधिकारी स्मिता नगारे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून अथक मेहनत घेतली आहे.

लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व विविध आजारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कर्करोग, थॕलेसेमिया, बोन मॕरो ट्रान्सप्लांट यासारख्या आजारग्रस्त विद्यार्थी आणि गरीब रूग्णांच्या २५० मुले विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण काल करण्यात आले. समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास हातभार लावल्याने शालेय वर्षाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून एक चांगला मदतीचा हात मिळाला. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, लिखाणासाठी साहित्य, कंपास बॉक्स, पेन अशा विविध वस्तूंचा पुरवठा या उपक्रमातून करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. आणखी एका कार्यक्रमात कर्करोगाचा सक्षमपणे आणि सातत्याने पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी मुकाबला करणार्‍या रूग्णांचा गौरव करण्यात आला. या रूग्णांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ केमोथेरपी घेत कर्करोगाविरूद्ध लढा कायम ठेवला आहे. या रूग्णांना उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

 

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content