Homeडेली पल्सहज यात्रेसाठी यंदा...

हज यात्रेसाठी यंदा 4,314 महिला जाणार मेहरमशिवाय!

यंदा हज यात्रेसाठीचे अर्ज आणि यात्रेकरूंची निवडप्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात करण्यात आली. यासाठी, यावर्षी आलेल्या एकूण 1.84 लाख अर्जांपैकी 14,935 हज इच्छुक अर्जदारांना यात्रेची संधी मिळाली आहे. (यात 10,621 अर्जदार 70 वर्षे वयाच्या वरील आहेत आणि 4,314 महिला मेहरमशिवाय जाणाऱ्या आहेत.) हज यात्रेसाठी जाणाऱ्या महिलांपैकी, मेहरमशिवाय, म्हणजे कोणत्याही पुरुष संरक्षकाशिवाय स्वतंत्रपणे जाणाऱ्या महिलांचा हा आजवरचा सर्वात मोठा जत्था आहे.

हज कोट्यापेक्षा जास्त आणि त्याहून अधिक प्राप्त झालेले अर्ज, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय, ऑनलाइन आणि रॅन्डम डिजिटल निवड (ORDS) प्रक्रियेद्वारे निवडण्यात आले आहेत. निवड प्रक्रियेतून निवडलेल्या आणि प्रतीक्षायादीतील अर्जदारांची यादी सर्व लोकांसाठी, ताबडतोब अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली असून, त्यामुळे या प्रक्रियेतील पारदर्शकता अधोरेखित झाली आहे. यात्रेसाठी निवड झालेल्या सर्व 1.4 लाख भाविकांना त्यांची निवड झाल्याचा मेसेज पाठवण्यात आला आहे. तसेच, जे प्रतीक्षायादीत आहेत, त्यांनाही त्यांच्या सद्यस्थितीची माहिती मेसेजद्वारे कळवण्यात आली आहे.

यात्रेकरूंना परदेशी चलनाची सुविधा मिळावी, यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाने भारतीय स्टेट बँकेसोबत भागीदारी केली आहे. त्यासाठी सरकार एसबीआयच्या सहकार्याने, यात्रेकरूंना अगदी माफक दरात परदेशी चलन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, यात्रेच्या काळात, रोख पैशांची चोरी किंवा वस्तू हरवून यात्रेकरूंचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व यात्रेकरूंना फॉरेक्स कार्ड देण्यात येत आहे. जर, यात्रेकरूकडून हे कार्ड गहाळ झाल्यास, त्याला बँकेकडून हे पैसे परत मिळू शकतील. फॉरेक्स कार्डसंदर्भात मार्गदर्शनासाठी एसबीआय, लवकरच एक मदत क्रमांक जारी करणार असून, इथले नोडल अधिकारी आणि वेबसाईटचा पत्ता लवकरच जाहीर केला जाईल.

2023ची हज यात्रा, यात्रेकरूंना अधिक आरामदायी, सुविधा देणारी आणि परवडणारी हवी, यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय सातत्याने प्रयत्न करत आहे. यात्रेकरुंची निवड अधिक तटस्थपणे, पारदर्शीपणे, योग्य वेळेत आणि कोणताही मानवी हस्तक्षेप न करता होण्यासाठी समर्पित प्रयत्न केले जात आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content