Homeपब्लिक फिगरमहाराष्ट्रातील 24 पूल...

महाराष्ट्रातील 24 पूल वाहतुकीसाठी तयार!

केंद्रीय रस्ते निधी-सीआरएफमधून महाराष्ट्रातील 91 रेल्वे उड्डाणपूल – आरओबीपैकी 31 आरओबीचे बांधकाम आपण ‘महारेल’ महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने चालू असलेल्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम कंपनीला दिले आहे. त्यापैकी 24 पूल त्यांनी बांधून वाहतुकीसाठी तयार केले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

महाराष्ट्रातील 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण तसेच नागपूर शहरातील 5 पुलाच्या भूमिपूजन समारंभ नागपूरच्या नंदनवन येथील केडीके कॉलेजजवळील गोरा कुंभार चौकात नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटन झालेल्या 9 उडानपुलामध्ये नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेल्वेस्टेशन, काटोल रेल्वेस्टेशन, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वेस्टेशन, नाशिकातील खेरवाडी रेल्वेस्टेशन, जळगाव रेल्वेस्टेशन, सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्टेशन, भिलवाडी रेल्वेस्टेशन या ठिकाणचे रेल्वे उड्डाणपूल तसेच ठाण्यातील तुर्भे उड्डाणपूल त्याचप्रमाणे मुंबईमधील मानखुर्द येथील उड्डाणपूल यांचा समावेश आहे. या बांधकामासाठी सुमारे 629 कोटी रुपये खर्च आला आहे.

तर भूमिपूजन झालेल्या नागपूर शहरातील 5  उड्डाणपुलामध्ये रेशीमबाग चौक ते केडीके कॉलेज चौक, चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक लाडपुरा, लकडगंज पोलीसस्टेशन ते वर्धमान नगर बगडगंज, राजेंद्र नगर ते हसनबाग चौक खरबी त्याचप्रमाणे वर्धमाननगर ते निर्मल नगरी यांचा समावेश आहे. या 5 उडानपुलाच्या कामासाठी सुमारे 792 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

याप्रसंगी नागपुरातील विविध विकास कार्याची माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पूर्व नागपुरात नवीन पारडी उड्डाणपुलामुळे अंतर कमी झाल्याने वाहतुकीचा वेळ वाचत आहे.

पेग

याप्रसंगी महारेल या उपक्रमाविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही कंपनी महाराष्ट्रामध्ये आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि व्यवस्थापकीय संचालक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीने झपाट्याने काम पूर्ण केले.

Continue reading

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...
Skip to content