HomeArchive८वी ते १२वीसाठी...

८वी ते १२वीसाठी ‘गोप्रेप’ अॅप!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी ग्रेडअपने गोप्रेप अॅप सुरू करण्याची घोषणा केली आहे. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीचे शालेय तयारीचे अॅप विद्यार्थ्यांच्या जेईई व नीट तयारीसह इतर शैक्षणिक गरजांची पूर्तता करेल. लॉकडाऊनमुळे शाळांनी नवे सत्र सुरू केले नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दोन महिन्यातील विषयांवर फ्री लाइव्ह क्लासेस सुरू करण्यावर ब्रँडचे लक्ष आहे.”
 
“अॅपच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मोफत लाइव्ह ऑनलाइन क्लासेस तसेच दिवसानुसार, रचनाबद्ध अभ्यासाच्या पद्धतीनुसार आखलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याचा पर्याय यांचा समावेश आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना घर न सोडता या क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षकांकडून शिकण्याची संधी मिळेल. या अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पारदर्शकता येण्यासाठी तसेच उत्तरे मिळवण्याच्या सहज आणि अखंड प्रक्रियेसाठी तसेच त्वरीत शंका निवारणासाठी विद्यार्थी फोटोही अपलोड करू शकतात. के १२ विभागात जेईई आणि नीटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोप्रेपच्या प्रभावी परीक्षांचीही तयारी करण्याची परवानगी असेल. जेणेकरून त्यांच्या शिकण्याचा निकालावर चांगला परिणाम होईल.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content