HomeArchiveस्वा. सावरकरांच्या विचारांच्या...

स्वा. सावरकरांच्या विचारांच्या अनुकरणाची गरज!

Details
स्वा. सावरकरांच्या विचारांच्या अनुकरणाची गरज!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

आज स्वा. सावरकर यांचा आत्मार्पण दिन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी आणि कृती ही केवळ त्या-त्या काळातील परिस्थितीशीच निगडीत नव्हती तर त्यांचे विचार प्रत्येक काळातल्या परिस्थितीशी संबंधित आहेत. येणा-या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्या विचारांची आजही देशाला गरज आहे. त्यांची विचारसरणी कुठल्याही चौकटीत मर्यादित राहत नाही तर ती अधिकाधिक व्यापक प्रमाणावर विस्तारीत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर तात्यारावांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या. ते म्हणतात, बौद्ध, जैन, शिख व चार्वाक पंथ वेद मानत नाही, म्हणून काय त्यांना हिंदू मानायचे नाही का? त्यांनी हिंदुजनांना चेतना दिली, चैतन्य दिले. त्यांचे विचार हे प्रत्येक काळाला अनुसरुन होते. सावरकर काळाच्या पुढचा विचार करायचे. उलटपक्षी सावरकर काळाशी सुसंगत होते. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारानुसार, या देशात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या नागरिकाची ओळख ही हिंदू आहे. हिंदू संस्कृतीशी त्यांची बांधिलकी आहे. हा विचार सावरकरांनी फार पूर्वीच सांगितला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वैचारिक कार्याची अधिक ओळख होते ती त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात केलेल्या कार्यामुळे.

तिथल्या 13 वर्षांच्या काळात त्यांनी अनेक चळवळी यशस्वी केल्या. यात जातीभेद, अस्पृश्यता, भाषाशुद्धी, स्वदेशी, साक्षरता प्रसार यांचा समावेश आहे. 1937 च्या कर्णावतीच्या भाषणात सावरकर यांनी हिंदू राष्ट्राविषयी आपले विचार प्रगट करताना संघटनात्मक पातळ्यांवर कार्य करण्याची प्रेरणा दिली होती. सामाजिक, राजकीय नि सांस्कृतिक अशा सर्वच अंगांनी हिंदुराष्ट्राच्या भवितव्याला आकार देणारी ती एक अखिल हिंदू संघटना असावी व अशा संघटनेच्या माध्यमातून अखिल हिंदूंनी एकत्र यावे, अशी त्यांची त्यामागची भूमिका होती. त्यांच्या भाषणात एकेठिकाणी हिंदुस्थान हे एकता पावलेले नि विसंवादरहित राष्ट्र मानता येत नाही, तर उलट हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे विद्यमान आहेत, असे वाक्य आहे. यावरून विनाकारण सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, अशी गरळ ओकायला सुरूवात केली. मूळात मुस्लिम राष्ट्र मानत नाहीत. ते एकाच प्रार्थनास्थळाला मानतात. त्यामुळे हिंदू हे राष्ट्र आहे ही संकल्पनाच मुस्लिमांना मान्य नाही, याअर्थाने सावरकरांनी वरील भाष्य केले होते. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रूपाने हिंदुस्थानला एक थोर व्यक्ती मिळाली असून त्यांच्या विचारांचा अवलंब आपल्या भल्यासाठीच आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शत्रूने ज्याची स्तुती केली ते तात्याराव सावरकर. लंडनमध्ये एका चौकात सावरकरांचा अर्धकृती पुतळा आहे. तो तिथे बसवू नये म्हणून कॉन्झरवेटिव्ह पक्षाने वाद घातला. परंतु, लेबर सरकारने सांगितले, “इंग्लंडच्या शत्रूंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, सावरकर हे त्यातील एक आहेत. इंग्लंड भाग्यवान राष्ट्र आहे. त्याला सावरकरांसारखा चारित्र्यसंपन्न, प्रखर राष्ट्रभक्त व कमालीचा बुद्धिमान शत्रू मिळाला.” सावरकरांनी भरकटलेल्या तरूणांना लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या, हा दिव्य संदेश दिला. निजामाच्या राज्यात बहुसंख्य हिंदू प्रजेवर अत्याचार होत होता व त्यांचे धर्मस्वातंत्र्य, नागरिक स्वातंत्र्य निजामाने बळकावून घेतले. त्याविरूद्ध या अधिवेशनात आंदोलन करण्याचे ठरले. सावरकर या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गांधीनी, हे आंदोलन जातीय झाले आहे असे सांगून, स्टेट काँग्रेस आणि आर्य समाजाला आंदोलन स्थगित करायला सांगितले. परंतु आर्य समाजाचे 17000 व हिंदू महासभेचे 4000 भूमीपुत्र व सेनापती बापट यांनी लढ्यात भाग घेतला. अखेर सावरकरांच्या तेजस्वी नेतृत्त्वापुढे निजाम नमला आणि नागरिक स्वातंत्र्याला मान्यता देत त्याने सुधारणांची घोषणा केली. सावरकरांच्या नेतृत्त्वाखाली भागानगरचा निशस्त्र लढा यशस्वी झाला.

1939 साली तात्यारावांनी बंगालच्या हिंदूंना सावध व संघटित राहण्याचा गुरूमंत्र दिला. 1040 साली तमिळनाडू, केरळमध्ये अनेक ठिकाणी जिल्हा व नगर येथे हिंदू संघटनांचे जोरदार कार्य केले. त्यासाठी कुठलेही काम त्यांना लहान वाटले नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 23 मार्च 1942 यादिवशी ब्रिटनचे मंत्री स्टीफर्ड क्रिफ्स भारतात आले. एकीकडे युद्धसमाप्तीनंतर देशाला स्वराज्य व प्रांतांना स्वतंत्र घटना बनवण्याची योजना तर दुसरीकडे संस्थानांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याची सवलत आणि संघराज्य होईपर्यंत संरक्षण मंत्रालयावर ब्रिटनचे नियंत्रण, अशी विचित्र आणि विक्षिप्त योजना घेऊन क्रिफ्स आले होते. त्याला नेहरूंसकट अनेक नेते भाळले. परंतु सावरकरांनी क्रिफ्सला चांगलेच ओळखले. सांवरकरांनी ती योजना फेटाळून लावली. चर्चेच्या वेळी क्रिफ्स तात्यारावांना कॅनडा, द. अफ्रिकेची उदाहरणे देऊ लागले. तेव्हा मातृभूमीचे लाडके नि निष्ठावान सुपूत्र तात्यासाहेब म्हणाले की, हिंदुस्थान हा एक अखंड देश असल्याचे तुमच्याच शासनाने मान्य केले आहे. इंडियन आर्मी, इंडियन रेल्वे असे तुम्हीच म्हणता, स्वयंनिर्णयाचे तत्त्व देशाला लागू असते, प्रांतांना नाही. यावर क्रिफ्स निरूत्तर झाले.

सावरकरांचे राजकीय आयुष्य केवळ दहा वर्षांचे होते. सावरकरांचे नेतृत्त्व काँग्रेसला परवडणारे नव्हते. सावरकरांनी विचाररूपी वृक्ष लावून आपल्यावर उपकार केले आहेत. सावरकर क्रांतिकारक नव्हते, ते क्रांतीचे कारक होते. सावरकर एखाद्या योग्यासारखे जगले. संसार थाटूनही ते वैरागी होते, तुकाराम महाराजांसारखे. तात्यांचा शेवट संतांनाही हेवा वाटावा असा झाला. त्यांचे डोळे समाधीनंतरही उघडेच होते. जणू ते त्यांच्या तेजस्वी डोळ्यांनी सर्वांना भासवत होते की, सबंध ब्रह्मांडच मी माझ्या डोळ्यात सामावले आहे. धन्योहं, धन्योहं.. त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी त्यांनी लिहलेले ग्रंथ वाचण्याचे थोडेफार कष्ट घ्यावे लागतील. हे ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्माकाच्या संकेतस्थळावर निशुल्क उपलब्ध आहेत.
– रणजित सावरकर,
कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.”
 
“आज स्वा. सावरकर यांचा आत्मार्पण दिन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी आणि कृती ही केवळ त्या-त्या काळातील परिस्थितीशीच निगडीत नव्हती तर त्यांचे विचार प्रत्येक काळातल्या परिस्थितीशी संबंधित आहेत. येणा-या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्या विचारांची आजही देशाला गरज आहे. त्यांची विचारसरणी कुठल्याही चौकटीत मर्यादित राहत नाही तर ती अधिकाधिक व्यापक प्रमाणावर विस्तारीत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर तात्यारावांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या. ते म्हणतात, बौद्ध, जैन, शिख व चार्वाक पंथ वेद मानत नाही, म्हणून काय त्यांना हिंदू मानायचे नाही का? त्यांनी हिंदुजनांना चेतना दिली, चैतन्य दिले. त्यांचे विचार हे प्रत्येक काळाला अनुसरुन होते. सावरकर काळाच्या पुढचा विचार करायचे. उलटपक्षी सावरकर काळाशी सुसंगत होते. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारानुसार, या देशात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या नागरिकाची ओळख ही हिंदू आहे. हिंदू संस्कृतीशी त्यांची बांधिलकी आहे. हा विचार सावरकरांनी फार पूर्वीच सांगितला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वैचारिक कार्याची अधिक ओळख होते ती त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात केलेल्या कार्यामुळे.

तिथल्या 13 वर्षांच्या काळात त्यांनी अनेक चळवळी यशस्वी केल्या. यात जातीभेद, अस्पृश्यता, भाषाशुद्धी, स्वदेशी, साक्षरता प्रसार यांचा समावेश आहे. 1937 च्या कर्णावतीच्या भाषणात सावरकर यांनी हिंदू राष्ट्राविषयी आपले विचार प्रगट करताना संघटनात्मक पातळ्यांवर कार्य करण्याची प्रेरणा दिली होती. सामाजिक, राजकीय नि सांस्कृतिक अशा सर्वच अंगांनी हिंदुराष्ट्राच्या भवितव्याला आकार देणारी ती एक अखिल हिंदू संघटना असावी व अशा संघटनेच्या माध्यमातून अखिल हिंदूंनी एकत्र यावे, अशी त्यांची त्यामागची भूमिका होती. त्यांच्या भाषणात एकेठिकाणी हिंदुस्थान हे एकता पावलेले नि विसंवादरहित राष्ट्र मानता येत नाही, तर उलट हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे विद्यमान आहेत, असे वाक्य आहे. यावरून विनाकारण सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, अशी गरळ ओकायला सुरूवात केली. मूळात मुस्लिम राष्ट्र मानत नाहीत. ते एकाच प्रार्थनास्थळाला मानतात. त्यामुळे हिंदू हे राष्ट्र आहे ही संकल्पनाच मुस्लिमांना मान्य नाही, याअर्थाने सावरकरांनी वरील भाष्य केले होते. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रूपाने हिंदुस्थानला एक थोर व्यक्ती मिळाली असून त्यांच्या विचारांचा अवलंब आपल्या भल्यासाठीच आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शत्रूने ज्याची स्तुती केली ते तात्याराव सावरकर. लंडनमध्ये एका चौकात सावरकरांचा अर्धकृती पुतळा आहे. तो तिथे बसवू नये म्हणून कॉन्झरवेटिव्ह पक्षाने वाद घातला. परंतु, लेबर सरकारने सांगितले, “इंग्लंडच्या शत्रूंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, सावरकर हे त्यातील एक आहेत. इंग्लंड भाग्यवान राष्ट्र आहे. त्याला सावरकरांसारखा चारित्र्यसंपन्न, प्रखर राष्ट्रभक्त व कमालीचा बुद्धिमान शत्रू मिळाला.” सावरकरांनी भरकटलेल्या तरूणांना लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या, हा दिव्य संदेश दिला. निजामाच्या राज्यात बहुसंख्य हिंदू प्रजेवर अत्याचार होत होता व त्यांचे धर्मस्वातंत्र्य, नागरिक स्वातंत्र्य निजामाने बळकावून घेतले. त्याविरूद्ध या अधिवेशनात आंदोलन करण्याचे ठरले. सावरकर या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गांधीनी, हे आंदोलन जातीय झाले आहे असे सांगून, स्टेट काँग्रेस आणि आर्य समाजाला आंदोलन स्थगित करायला सांगितले. परंतु आर्य समाजाचे 17000 व हिंदू महासभेचे 4000 भूमीपुत्र व सेनापती बापट यांनी लढ्यात भाग घेतला. अखेर सावरकरांच्या तेजस्वी नेतृत्त्वापुढे निजाम नमला आणि नागरिक स्वातंत्र्याला मान्यता देत त्याने सुधारणांची घोषणा केली. सावरकरांच्या नेतृत्त्वाखाली भागानगरचा निशस्त्र लढा यशस्वी झाला.

1939 साली तात्यारावांनी बंगालच्या हिंदूंना सावध व संघटित राहण्याचा गुरूमंत्र दिला. 1040 साली तमिळनाडू, केरळमध्ये अनेक ठिकाणी जिल्हा व नगर येथे हिंदू संघटनांचे जोरदार कार्य केले. त्यासाठी कुठलेही काम त्यांना लहान वाटले नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 23 मार्च 1942 यादिवशी ब्रिटनचे मंत्री स्टीफर्ड क्रिफ्स भारतात आले. एकीकडे युद्धसमाप्तीनंतर देशाला स्वराज्य व प्रांतांना स्वतंत्र घटना बनवण्याची योजना तर दुसरीकडे संस्थानांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याची सवलत आणि संघराज्य होईपर्यंत संरक्षण मंत्रालयावर ब्रिटनचे नियंत्रण, अशी विचित्र आणि विक्षिप्त योजना घेऊन क्रिफ्स आले होते. त्याला नेहरूंसकट अनेक नेते भाळले. परंतु सावरकरांनी क्रिफ्सला चांगलेच ओळखले. सांवरकरांनी ती योजना फेटाळून लावली. चर्चेच्या वेळी क्रिफ्स तात्यारावांना कॅनडा, द. अफ्रिकेची उदाहरणे देऊ लागले. तेव्हा मातृभूमीचे लाडके नि निष्ठावान सुपूत्र तात्यासाहेब म्हणाले की, हिंदुस्थान हा एक अखंड देश असल्याचे तुमच्याच शासनाने मान्य केले आहे. इंडियन आर्मी, इंडियन रेल्वे असे तुम्हीच म्हणता, स्वयंनिर्णयाचे तत्त्व देशाला लागू असते, प्रांतांना नाही. यावर क्रिफ्स निरूत्तर झाले.

सावरकरांचे राजकीय आयुष्य केवळ दहा वर्षांचे होते. सावरकरांचे नेतृत्त्व काँग्रेसला परवडणारे नव्हते. सावरकरांनी विचाररूपी वृक्ष लावून आपल्यावर उपकार केले आहेत. सावरकर क्रांतिकारक नव्हते, ते क्रांतीचे कारक होते. सावरकर एखाद्या योग्यासारखे जगले. संसार थाटूनही ते वैरागी होते, तुकाराम महाराजांसारखे. तात्यांचा शेवट संतांनाही हेवा वाटावा असा झाला. त्यांचे डोळे समाधीनंतरही उघडेच होते. जणू ते त्यांच्या तेजस्वी डोळ्यांनी सर्वांना भासवत होते की, सबंध ब्रह्मांडच मी माझ्या डोळ्यात सामावले आहे. धन्योहं, धन्योहं.. त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी त्यांनी लिहलेले ग्रंथ वाचण्याचे थोडेफार कष्ट घ्यावे लागतील. हे ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्माकाच्या संकेतस्थळावर निशुल्क उपलब्ध आहेत.
– रणजित सावरकर,
कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.”
 
Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content