HomeArchiveस्टार प्रचारक!

स्टार प्रचारक!

Details
स्टार प्रचारक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
निवडणुकीत स्टार प्रचारक महत्त्वाचे असतात. आपल्या पक्षासाठी मतांचे पीक घेण्याचे काम ते करतात. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात काँग्रेसला स्टार प्रचारकांची गरज नव्हती. नेहरू स्वत: इतके लोकप्रिय होते की भारतीय जनता त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकण्यास तयार होती. नेहरूंनंतर अल्पकाळासाठी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. ते अकाली गेले. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इंदिरा गांधीदेखील आपल्या पित्याप्रमाणेच लोकप्रिय ठरल्या. त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक बनल्या. आणीबाणीनंतर जनता पक्ष स्थापन झाला. त्या पक्षात स्टार प्रचारकांची कमतरता नव्हती. मोरारजी देसाई, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, राजनारायण आदी अनेक नेते जनता पक्षाचे स्टार प्रचारक बनले. तथापि, दोनच वर्षांत जनता पक्षाचे सरकार कोसळले. 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन राष्ट्रीय पक्ष म्हणून एकमेकांच्या विरोधात सदैव उभे ठाकले.

भाजपची स्थापना झाली तेव्हा अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह तरूण प्रमोद महाजन स्टार प्रचारक म्हणून देशभर फिरत होते. आता अटलजी आणि प्रमोदजी हयात नाहीत. अडवाणीजी आणि मुरली मनोहर जोशी हे वयोवृद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवरील भाजपचे एकमेव स्टार प्रचारक आहेत, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम वक्ते आहेत. तेच भाजपचे राज्यातील स्टार प्रचारक आहेत. पण त्यांच्याबरोबर सध्या प्रचारात फिरत असलेला दुसरा स्टार प्रचारक म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होय. आठवले यांच्या पक्षाचा एकदेखील उमेदवार रिंगणात नाही. स्वत: आठवले राज्यसभा सदस्य आहेत. पण शिवसेना-भाजप युतीला विजयी करण्यासाठी ते पायाला भोवरा लावून सर्वत्र फिरत आहेत.

त्यांची विनोदी चारोळ्या असलेली भाषणे लोकांना आवडत आहेत. आतापर्यंत फडणवीस यांनी 34 लोकसभा मतदारसंघात 70 सभा घेतल्या. त्यांपैकी 90 टक्के सभांमध्ये त्यांच्यासोबत रामदास आठवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याव्यतिरिक्त रामदास आठवले मंचावर हमखास असतात. याचे कारण आठवले यांना मानणारा महाराष्ट्रात मोठा दलित वर्ग आहे. आठवले काँग्रेस सरकारमध्ये राज्यात समाजकल्याण मंत्री असताना त्यांच्या चेंबरबाहेर लोकांची प्रचंड गर्दी उसळलेली दिसत असे. कोणत्याही मंत्र्याच्या दालनाबाहेर तशी गर्दी आजपर्यंत मंत्रालयात कोणी पाहिलेली नाही. आठवले यांची ही लोकप्रियता हेवा वाटावी, अशीच होती. किंबहुना, ती आजही कायम आहे. आठवले सदैव लोकांमध्ये असतात. त्यांच्या सुख-दु:खांत सामील होतात. केवळ राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील कार्यकर्त्यांनादेखील पहिल्या नावाने ओळखतात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या ठायी हा गुण होता. दादा सांगलीचे होते आणि आठवलेदेखील सांगलीचे आहेत. तेव्हा आचार्य अत्र्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास `सांगली! सांगलीची मुले चांगली’ असेच म्हणावे लागेल.

काँग्रेसमध्ये असताना आठवले यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचा प्रचार केला. शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेसने तो आठवलेंसाठीच सोडला. पण विखे परिवाराने आठवले यांच्याविरोधात काम केल्यामुळे हमखास विजयाची खात्री असलेल्या या मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची संगत सोडून आठवले आधी शिवसेनेबरोबर आणि नंतर भाजपबरोबर गेले. केंद्रात त्यांना राज्यमंत्रीपद देऊन भाजपने त्यांच्या श्रमांचे चीज केले. आज आठवले भाजपचे स्टार प्रचारक बनले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनाही आपल्यासह ते हवे असतात, ही आठवलेंच्या लोकप्रियतेची पावती आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...
Skip to content